DSP ‘सिंघम’च्या केसला नवं वळण, प्रतिज्ञापत्रामध्ये पत्नीनं पोलिसांवर केले ‘गंभीर’ आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डीएसपी अतुल सोनी द्वारे पत्नीवर गोळी चालवण्यात आल्याच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. पत्नीने सोमवारी एक प्रतिज्ञापत्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवले. यात त्यांनी फायरिंगच्या कथेला खोटे असल्याचे सांगितले आहे. त्यांचे म्हणणे आहे की एफआयआरमध्ये पोलिसांनी खोटी कहानी रचली आहे. तर पोलिसांचे म्हणणे आहे की अतुल सोनी यांनी फायरिंगसाठी ज्या पिस्तुलाचा वापर केला होता ते पिस्तुल अवैध होते. या घटनेत एक गोळी देखील चालवली गेली ज्याची पुंगळी जप्त करण्यात आली.

एसएसपी कुलदीप सिंह चहल यांनी सांगितले की पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. नियमांनुसार पोलिसांद्वारे प्रकरणावर कारवाई करण्यात येईल. माहितीनुसार डीएसपी अतुल सोनी यांच्या पत्नी सुनिता सोनी यांनी सोमवारी प्रतिज्ञापत्राची प्रत मोहालीच्या एसएसपी कुलदीप सिंह चहल आणि डीएसपी रमनदीप सिंह यांच्याकडे पाठवली. याशिवाय त्यांनी दावा केला की त्यांच्या वकीलांनी देखील प्रतिज्ञापत्राची एक प्रत पोलीस स्टेशनला जाऊन जमा केली आहे.

सुनिता सोनी यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले की जेव्हा प्रकरणाची एफआयआर पाहिली तेव्हा कळाले की त्यात गोळी चालवण्यात आल्याचा उल्लेख होता. त्यांनी सांगितले की जेव्हा त्यांचा आणि पतीचा वाद झाला होता तेव्हा त्यांच्या मुलीने पोलिसांना फोन करुन बोलावून घेतले होते. या दरम्यान घरात हिंसा झाल्याचे सांगितले गेले आहे. ही तक्रार त्यांनी किंवा त्यांच्या मुलीने लिहिली किंवा वाचली नव्हती. गोळी चालवण्याची कथा पोलिसांनी स्वत: रचली आहे.

फेज 8 पोलीस स्टेशनच्या शिवदीप सिंह बराड यांनी सांगितले की त्यांनी घटनास्थळावरुन एक पुंगळी आणि एक पिस्तुल जप्त केली, जी अवैध होती. तपासानंतर उघड झाले की त्यात एक गोळी होती. जेव्हा प्रतिज्ञापत्राबाबत पोलिसांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की अद्याप असे कोणतेही प्रतिज्ञापत्र आम्हाला मिळाले नाही. पोलिसांनी डीएसपी अतुल सोनीवर त्यांच्या पत्नीच्या तक्रारीनंतर खूनाचा प्रयत्न, मारहाण, घरगुती हिंसा आणि आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत केस दाखल केली होती.

फेसबुक पेज लाईक करा –