‘मी एका ऑपरेशनवर होतो, तुम्ही माझ्या प्लॅनवर पाणी फिरवलं’, आतंकवाद्यांसोबत पकडल्या गेलेल्या DSP नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिजबुल कमांडर नवीद बाबूच्या सोबत अटक करण्यात आलेले डीएसपी दविंदर सिंह प्रकरणाबाबत चौकशी सुरु आहे. त्यांचे काही पाकिस्तानी कनेक्शन आहे का याबाबत देखील तपासणी केली जात आहे. तसेच याबाबत त्यांच्या नातेवाईकांच्या घराची देखील झडती घेण्यात आली आहे. डीजीपी दिलबाग सिंह यांनी देखील याबाबत मोठा खुलासा होऊ शकतो असे सांगितले आहे. तसेच चौकशी दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्याची देखील त्यांनी माहिती दिली.

ज्या दहशतवाद्यांसोबत दविंदरला पकडण्यात आले त्या अतिरेक्यांना दविंदरने स्वतःचे खाजगी सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, मी एका मिशनवर होतो आणि जर हे यशस्वी झाले असते तर स्थानिक पोलिसांचे मोठे कौतुक देखील झाले असते. एवढेच नाही तर तुम्ही सगळ्यांनी येऊन माझा प्लॅन अयशस्वी केला असे देखील दविंदर म्हणाला.

हे प्रकरण खूप मोठे असल्यामुळे याबाबतच्या तपासासाठी एनआयएला पाचारण करण्यात आले आहे. डीएसपींना कामावरून सस्पेंड करून त्यांचा राज्य पुरस्कार देखील मागे घेण्यात आलेला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत गृहसचिवांना भेट दिली. आयजी स्तरीय अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील. एनआयएशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, हे प्रकरण तपासणीला सुरुवात केल्यानंतर तपास यंत्रणा जम्मूमध्ये आवश्यक औपचारिकता पूर्ण करेल.

ज्या दिवशी डीएसपींना अटक झाली होती त्या दिवशी वकील इरफान अहमद मीरला देखील पकडण्यात आले होते. हा पाकिस्तान विरोधातील मोठा पुरावा ठरू शकतो. कारण तो पाच वेळा भारतीय पासपोर्टवर पाकिस्तानला गेला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like