खळबळजनक खुलासा ! बडतर्फ DSP दविंदर सिंहनं आतंकवाद्यांना ‘आश्रय’ देऊन बनवले 3 अलिशान बंगले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदिनच्या आतंकवाद्यांसोबत पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकारी दविंदर सिंह यांची नॅशनल इन्वेस्टीगेशन एजंसी वारंवार चौकशी करत आहे. या दरम्यान अनेक चकित करणारी माहिती समोर येताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतंकवाद्यांना आश्रय देण्यासाठी दविंदर सिंह यांनी तीन वेगवेगळी घरं घेतली होती. या प्रकरणी बुधवारी श्रीनगरमधील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. एनआयएचे मोठे अधिकारी आज श्रीनगरमधून दिल्लीला आले आहेत. परंतु एनआयएची 5 सदस्यांची टीम अद्याप श्रीनगरमध्येच आहे. पुढील तपासासाठी ही टीम श्रीनगरमध्येच असणार आहे. दविंदर यांनाही अद्याप दिल्लीत आणलेलं नाही.

आतंकवाद्यांचा ठिकाणा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दविंदर यांनी ना केवळ त्यांच्या श्रीनगरमधील इंदिरानगरमधल्या घरात राहण्याची सोय केली तर चानपोरा आणि सनत नगर भागातही त्यांच्या राहण्याची सोय केली होती. असेही आरोप आहेत की, हे घर निर्दोष लोकांना आतंकवादाच्या प्रकरणात फसवून त्यांच्याकडून घेतलेल्या पैशातून बनवलं आहे. दविंदर आतंकवाद्यांना लपवण्यासाठी गुलशन नगरमधील एका डॉक्टरच्या घराचाही वापर करत असे. या ठिकाणी त्यांनी हिजबुल कमांडर नवीद सहित अनेक आतंकवाद्यांना ठेवून घेतलं होतं.

सूत्रांच्या हवाल्यानं असंही समजत आहे की, 1997 मध्ये दविंदर यांनी अमुल बटरचा एक ट्रक चोरी केला होता. हा ट्रक त्यावेळी जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री राहिलेले मोहिदिन शहा यांच्या कुटुंबाचा होता. या प्रकरणी केसही दाखल झाली आहे. परंतु त्यावेळी दविंदर सिंहांचा बॉस असणाऱ्या अधिकाऱ्यानं त्यांना वाचवलं होतं.

फेसबुक पेज लाईक करा –