डीएसके चा मुलगा शिरीष कुलकर्णीला अटक, 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडी

पुणे:  पोलीसनामा ऑनलाइन

गुंतवणूक दाराची फसवणुकी प्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी या मागील तीन महिन्यांपासून अटकेत आहे. त्यांच्यासह आज अखेर आठ जणांना अटक करण्यात आली असून आज पोलिसांनी डीएसके चा मुलगा शिरीष कुलकर्णी यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17d835b5-788c-11e8-b85e-b3f27a7d0c50′]

गुंतवणूकदाराची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी हे मागील तीन महिन्यांपासून अटकेत आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी डीएसके च्या जवळील नातेवाईक आणि चार बँक आधिकायांना देखील अटक केली आहे. या प्रकरणी आणखी काही संशयित आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. यातील प्रमुख संशयित डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी हा होता. तो अटक होऊ नये म्हणून सर्वेच न्यायालया पर्यंत दाद मागितली. मात्र तिथे अटक पूर्व जामीन फेटाळून लावून 25 जुलै पर्यंत पोलिसासमोर हजर राहण्याचे आदेश दिले. याची मुदत आज संपल्याने आज सायंकाळच्या सुमारास शिरीष कुलकर्णी पोलीसा समोर हजर होताच. पोलिसांनी त्याला न्यायालया समोर हजर केले. त्यावेळी न्यायालयाने 2 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.