DTF लीगल सर्व्हिसेस आणि सुमीत ग्रुपच्या वतीनं उद्या पुण्यात सायबर सुरक्षा कार्यशाळा, प्रवेश मोफत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील डी.टी.एफ लीगल सर्व्हिसेस हि कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून सायबर गुन्ह्यांचा तपास आणि माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुन्ह्यांच्या तपासाबाबत कायदेशीर सल्ला देण्याचे काम करीत आहे.

आजकालच्या वाढत्या इंटरनेट आणि मोबाईल वापरामुळे दिवसेंदिवस सायबर क्राईम गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे त्याबाबत जागरूकता निर्माण करणे. पोलीस, वकील,पत्रकार आणि विद्यार्थी यामध्ये नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतात. डी टी एफ लीगल सर्व्हिसेस आणि सुमीत ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर सुरक्षा अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.

पुणे शहरात प्रथमच पत्रकार, पोलीस आणि विद्यार्थी यांच्यासाठी मोफत एकदिवसीय सायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सायबर क्राईम अभ्यासक, वकील आणि पोलीस अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे उद्या दि २८ जानेवारी २०२०, रोजी सकाळी १० ते १ या वेळेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ट्रिनिटी अकॅडमि ऑफ इंजिनीरिंग कॉलेज चे प्राचार्य डॉ.निलेश उके, एस व्ही सी पी सिंहगड कॉलेजच्या उपप्राचार्य सुजाता बियाणी, न्यूज १८ लोकमत चे वरिष्ठ पत्रकार वैभव सोनवणे, डेक्कन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड, दत्तवाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, सोशल मीडिया अभ्यासक धनंजय देशपांडे,
ऍड.पुष्कर पाटील, करिष्मा पाटील, सुमित ग्रुप चे संस्थापक डॉ. प्रभाकर साळुंके उपस्थीत राहणार आहेत.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ८५३०७४८०५५ या क्रमांकावर नाव नोंदणी करता येईल. सायबर क्राईम कार्यशाळेमध्ये सहभाग घेणाऱ्यांना डीटीएफ लीगल सर्व्हिसेस आणि सुमीत ग्रुप यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येईल.