Dual WhatsApp Accounts | एकाच मोबाईलमध्ये वापरा 2 WhatsApp अकाउंट; जाणून घ्या सोपी प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Dual WhatsApp Accounts | सध्या धावपळीच्या युगात सोशल मिडियाचीही धावपळ अधिक वाढली आहे. WhatsApp ने जगभर एक जाळं पसरलं आहे. अनेकवेळा अनेक लोक दोन सिम कार्ड (SIM Card) वापरतात. त्यावेळी त्यांना दोन्ही नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करायचे असते. जर तुम्ही एकाच फोनमध्ये दोन्ही सिम कार्ड टाकले असतील तर दोन्ही WhatsApp ओपन कसे कराल ? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतो. दरम्यान अ‍ॅप्सद्वारे तुम्ही मोबाईलमध्ये 2 व्हॉट्सअ‍ॅप (Dual WhatsApp Accounts) अकाउंट सुरू करु शकता.

 

दरम्यान, तुमच्या मोबाईलमध्ये कुठल्याही थर्ड पार्टी अ‍ॅप शिवाय देखील 2 व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सहज चालवू शकता. यासाठी मोबाईलमध्ये केवळ 1 सेटिंग करावी लागणार आहे. Xiaomi, Samsung, Vivo, Oppo, Huawei आणि Honor सारख्या कंपन्यांना आता Dual Apps अथवा Dual Mode फीचर देण्यात आले आहे. ज्या माध्यमातून युजर्स एकाच मोबाईलमध्ये 2 WhatsApp अकाउंट चालवू शकणार आहे. (Dual WhatsApp Accounts)

 

सॅमसंग (Samsung) –
ड्युअल मेसेंजर : यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर Advanced Features वर जा आणि Dual Messenger वर जा. येथे तुम्हाला हे फीचर चालू करावे लागणार आहे.

 

Xiaomi (MIUI) –
ड्युअल अ‍ॅप्स : तुम्हाला Xiaomi फोनमध्ये दोन व्हॉट्सअ‍ॅप एकाच वेळी चालवायचे असतील तर तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला Dual Apps सर्च करावे लागतील. ते चालू करून तुमचे काम होईल.

 

ओप्पो (Oppo) –
क्लोन अ‍ॅप्स : ओप्पोच्या फोन मध्ये, ड्युअल व्हॉट्सअ‍ॅप चालवण्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल. मग तुम्हाला क्लोन अ‍ॅप्स शोधावे लागतील आणि ते चालू करून तुमचे काम होईल.

 

विवो (Vivo) –
अ‍ॅप क्लोन : या फोनमध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल आणि त्यानंतर अ‍ॅप क्लोनमध्ये जाऊन ते चालू करावे लागेल.

 

अँसुस (Asus) –
ट्विन अ‍ॅप्स : या फोनमध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल आणि त्यानंतर ट्विन अ‍ॅप्समध्ये जाऊन ते चालू करावे लागेल.

 

Huawei आणि Honor –
अ‍ॅप ट्विन : Huawei आणि Honor फोनमध्ये ड्युअल व्हॉट्सअ‍ॅप चालवण्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. मग तुम्हाला अ‍ॅप ट्विन शोधायचे आहे आणि ते चालू करून तुमचे काम पूर्ण होईल.

 

असं करा सेटिंग –

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.

यानंतर, तुमच्या फोननुसार, तुम्हाला ड्युअल अ‍ॅप सेटिंग चालू करावे लागेल.

तुम्हाला ज्या अ‍ॅपची डुप्लिकेट आवृत्ती हवी आहे ते निवडा.

यात व्हॉट्सअ‍ॅप निवडा. नंतर प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा.

आता, होम स्क्रीनवर जा आणि तुम्हाला तुमच्या अ‍ॅप लाँचरमध्ये दिसणार्‍या इतर WhatsApp लोगोवर टॅप करा.

त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर नोंदणी करायचा असलेला नंबर टाका आणि सुरू ठेवा.

यानंतर तुमचे खाते तयार होईल आणि तुम्ही ते वापरू शकाल.

 

Web Title :- Dual WhatsApp Accounts | how to use dual whatsapp account on one smartphone

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा