‘या’ भारतीय व्यापाऱ्याने पाकिस्तानातील दुष्काळी भागात बसवले ‘हॅन्डपंप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात कायमच तणावपुर्ण परिस्थिती राहिली आहे. परंतू मानवता काय असते याचा विचार केला तर सध्या सोशल मिडियावर एका पोस्टने चांगलाच धूमाकुळ घातलाय. दुबई मध्ये बिजनेस करणाऱ्या एका भारतीयाने पाकिस्तानात तब्बल ६० हँडपंप लावले आहेत. देशा-देशातील संबंध एकीकडे आणि मानवतेचा धर्म एकीकडे. पाकिस्तानमधील दक्षिण पूर्व प्रांत सिंध येथील अत्यंत गरीबी असलेल्या भागात या व्यावसायिकाने पाण्यासाठी ६० पेक्षा जास्त हँडपंप लावून लोकांची तहान भागवली आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून जोगिंदर सिंह सलारिया यांना या भागातील परिस्थिती कळाली. त्यांनी पाकिस्तानातील थारपरकर जिल्हातील स्थानिक सामजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन ६० पेक्षा जास्त हँडपंप लावले. त्याबरोबरच त्यांनी तेथील लोकांसाठी खाण्याचे सामान देखील पाठवून दिले.

सलारिया १९९३ पासून यूएईचे नागरिक आहेत आणि ट्रांसपोर्टचा व्यवसाय करतात. त्यांना सोशल मिडियातून पाकिस्तानातील या भागाची परिस्थिती कळाली त्यानंतर त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून तेथील सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचून आणि त्यांच्याशी संपर्क साधून तेथील कामासाठी पैसे उपलब्ध करुन दिले. सलारिया यांनी दाखवलेल्या दिलदार आणि मानवतेच्या वृत्तीने सोशल मिडियातून त्यांचे कौतूक होताना दिसत आहे.

खलीज टाइम्स च्या वृत्तानुसार, सलारिया यांनी सांगितले की ज्यावेळी पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानच्या संबंधित तणाव वाढले होते तेव्हा ते त्या गावांमध्ये हँडपंप बसवण्याचे काम करत होते. खलीज टाइम्स संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमांच्या रिपोर्टनुसार सांगितले आहे की, थारपारकर जिल्हातील सिंध प्रांताचा सर्वात कमी विकास झाला आहे. तेथील तब्बल ८७ टक्क्यांपेक्षा जास्त जनता गरीब आहे.