…म्हणून दुबईच्या राजपुत्राने मर्सिडिज वापरणे केले बंद, माणुसकीने जिंकली मने ! पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छोट्या गोष्टींवरुन माणसाचा मोठेपणा कळून येत असतो. असेच एक उदाहरण दुबईच्या राजपुत्राच्या बाबतीत घडले आहे. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्यावर सध्या सोशल मीडियामध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांनी चक्क एका पक्षाच्या घरट्यासाठी लग्जरी मर्सिडीज एसयूव्ही वापरणे बंद केले आहे.

क्राऊन प्रिन्स मकतूम यांना मर्सिडीज एसयूव्हीच्या बोनेटवर एका पक्षाने घरटे बनवल्याचे दिसले.त्यामुळे गाडीचा वापर करण्यासाठी त्यांना घरटे हटवावे लागणार होते. त्या घरट्यात पक्षाने अंडे दिले होते. पण, मकतूम यांनी घरटे न हटवता थेट ती एसयूव्हीच न वापरण्याचा निर्णय घेतला. याशिवाय गाडीच्या जवळपास कोणी जाणार नाही याचीही खबरदारी त्यांनी घेतली. जोपर्यंत अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडत नाहीत तोपर्यंत गाडी वापरणार नाही असे त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

त्यानंतर आता त्यांनी अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अंड्यांमधून पिल्ले बाहेर आल्याचे दिसत असून पक्षी पिल्लांची काळजी घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ 24 तासांमध्येच 1 दशलक्षहून जास्त जणांनी पाहिला आहे. एका पक्षाच्या घरट्यासाठी राजपुत्राने दाखवलेल्या माणुसकीचे नेटकरी कौतुक करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like