दुबईत सेल्समनची नोकरी करणार्‍यावर नशीब ‘मेहरबान’, लागली 7 कोटीची लॉटरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखाद्याच्या आयुष्याला कधी कलाटणी मिळेल सांगता येत नाही. असेच जणू काही एका भारतीय व्यक्तीविषयी घडले आहे. दुबईत सेल्समनची नोकरी करणा-या सुनील कुमार कथुरियान (वय 33) याला दुबईमध्ये चक्क 10 लाख युएस डॉलरची लॉटरी लागली आहे. भारतीय रुपयाप्रमाणे ही रक्कम 7 कोटी (dubai-salesman-won-7-crore) आहे. सुनीलची घरची परिस्थिती अगदी सर्वसामान्य आहे. पण एका क्षणात त्याच्या कुटुंबाच नशीब पालंटल आहे.

इंडिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील कुमार एका खासगी कंपनीत गेल्या 12 वर्षापासून सेल्समन म्हणून काम करतात. 1 मिलियन डॉलर्स जिंकणारा सुनील 342 वा व्यक्ती आहे. त्याने 17 ऑक्टोबर राजी लॉटरीचे तिकिट ऑनलाइन खरेदी केले. डीडीएफ मिलेनियर ड्रॉमध्ये 7 कोटींचे बक्षीस जिंकले. 10 लाख डॉलर्स जिंकणारा सुनील 170 वा भारतीय ठरला आहे.

सुनील म्हणाला की, गेली अनेक वर्ष ते बहरीनमध्ये राहत आहे. दुबईत गेली 10-12 वर्ष सुनील सेल्समन म्हणून काम करत आहेत. त्यांना हे पैसे चांगल्या कामासाठी वापरायचे आहेत. या पैशातून देगणीही देणार आहे. तसेच त्यांना घरही घ्यायचे आहे.सुनील यांची घरची परिस्थिती ठिक नव्हती, अशातच ही लॉटरी त्यांच्यासाठी फायद्याची ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन लॉटरी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.