… म्हणून दुबईमध्ये Air India एक्स्प्रेसच्या विमानांना 15 दिवसांसाठी बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुबईमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्यामुळे एअर इंडियाच्या विमानांचा दुबईतील प्रवेश नाकारण्यात आला होता. या आधीही कंपनीकडून दोन वेळा नियमांचं उल्लंघन करण्यात आल आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानातून दुबईला गेलेल्या करोनाग्रस्त प्रवाशांच्या उपचाराचा आणि क्वारंटाइन ठेवण्याचा खर्चही एअर इंडिया कंपनीला करावा लागणार आहे. एअर इंडिया कंपनीला पुन्हा विमानं सुरू करण्यासाठी,हे प्रकार थांबवण्यासाठी सुधारणा करण्यास सांगितले आहे. ४ सप्टेंबर रोजी जयपुरहून दुबई ला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातुन कोरोना झालेल्या एका रूग्णानी प्रवास केला होता. त्याला कोरोना झाला आहे तरीही कंपनीनं त्याला प्रवास करण्यास परवानगी दिली होती.

हे नियम आहेत
एअर इंडियानकडून संयुक्त अरब अमिरातीला जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी गेल्या महिन्यापासून कोरोनाचा चाचणी अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. १२ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असेलेल्या प्रवशांनी विमानातून प्रवास करण्याअगोदर त्यांना आपला कोरोनाचा नकारात्मक अहवाल देणे गरजेचे आहे. सरकारमान्य चाचणी केंद्रातून नकारात्मक अहवाल मिळवणं प्रवाशांसाठी अनिवार्य असणार आहे. तसेच त्यांनी कोविड १९ पीसीआर चाचणी करणेही गरजेचं असणार आहे. परंतु तो अहवाल प्रवास करण्याच्या ९६ तासांपूर्वीचा नसावा असं तत्वात नमूद करण्यात आले आहे.