१० वीत नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – १० बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुंडलीकनगर येथील न्यू हनुमाननगर परिसरात शनिवारी दुपारी समोर आली आहे. याप्रकरणी पुंडिलकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनिकेत संजय शेळके (वय १६) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

अनिकेत हा ज्ञानप्रकाश विद्यामंदिरमध्ये शिक्षण घेत होता. शनिवारी दहावीचा निकाल लागला. त्याने एक वाजता अनिकेतने मोबाईलवर निकाल पाहिला. त्यात तो नापास झाल्याचे समोर आले. मात्र ही बाब त्याने कोणालाही सांगितली नाही.

त्यानंतर त्याने त्याच्या खोलीत जाऊन छताच्या हुकाला स्कार्फने गळफास घेऊन आत्मह्या केली. दुपारी साडेचारच्या सुमारास त्याच्या नातेवाईकांनी त्याचे दार ठोठावले. मात्र तो प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला उपचारापुर्वीच मृत घोषित केले.

You might also like