अरे व्वा ! उजनीतील पाणीसाठा 104 %

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी (यशवंत सागर) जलाशयात पाणीसाठा मुबलक असल्याने उन्हाळ्यात पिकांसाठी पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे चित्र आहे. आज अखेर उजनीत १०४.३५ टक्के (११९.५७ TMC) पाणीसाठा (ujani dam water) असल्याने सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.

पुणे जिल्हा व परिसरात मागीलवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उजनी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले. परिणामी, भीमा (चंद्रभागा) दुथडी भरून वाहत होती. तथापि, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठा कमी न झाल्याने उजनी जलाशयाच्या वरील बहुतांश पाणथळ जागा अद्यापही पाण्यातच आहे. तसेच पाणीसाठा जास्त असूनही येणाऱ्या पक्षांची संख्या कमी आहे. त्याचप्रमाणे पाणी मोठ्या प्रमाणात असले तरी मच्छिमारांना मासे सापडत नाही.

कारण, जलाशयाच्या काठी माशांना लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणीच्या जागा असल्याने, मासे अडचणीत राहणे पसंत करतात. या जागा अद्यापही रिकाम्या झाल्या नाहीत. त्या पाण्याखालीच आहेत. जलाशयाचे पाणी कमी झाल्यावर मासे सापडतील, असे मच्छिमारांचे म्हणणे आहे.

उजनीची आजची स्थिती
एकूण पाणीसाठा : ३३२८.२८ (दलघमी)
एकूण पाणी पातळी : ४९७.२७ (मीटर)
उपयुक्त पाणीसाठा : १५१७.३० (दलघमी)
आजचा पाणीसाठा : ११९.५७ (टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा : १०४.३५ (टक्के)