‘मलेरियामुळं 30 टक्क्यांनी वाढतो हार्ट फेलचा धोका’ : रिसर्च

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मलेरियामुळं हार्ट फेलचा धोका 30 टक्क्यांनी वाढतो. WHO आणि 2018 च्या आकडेवारीनुसार डासांमुळं होणारा मलेरिया दरवर्षी जगातील 21.9 कोटींहून अधिक लोकांना प्रभावित करतो. डेनमार्कच्या हार्लेव जेनटोफ्ट युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमधील अभ्यासक फिलिप ब्रेनिन यांनीही एका रिसर्चचा हवाला देत यासंदर्भात माहिती दिली आहे.

कसा केलाय यावरील रिसर्च ?

जानेवारी 1994 ते जानेवारी 2017 दरम्यान मलेरिया झालेल्या रुग्णांची अभ्यासकांनी ओळख पटवली. यातील रुग्णांचं सरासरी वय हे 34 होतं. यात 58 टक्के पुरुष होते. मलेरियाच्या जवळपास 4000 केसेस आढळून आल्या. रुग्णांवर 11 वर्षे करण्यात आलेल्या अभ्यासानंतर हार्ट फेलच्या 69 केसेस समोर आल्या. हे प्रमाण सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत अधिक आहे. याशिवाय हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांमुळं एकूण 68 मृत्यू झाल्याचंही आढळून आलं आहे.

मलेरियामुळं ब्लड प्रेशर प्रणाली प्रभावित होते

ब्रेनिन यांनी सांगितलं की, या रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांची 30 टक्के वाढीची शक्यता दिसून आली. यावर रिसर्च होण्याची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं. अलीकडे झालेल्या रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, मलेरिया मायोकार्डिम (मांसपेशी टिश्यू) मध्ये बदलांचं कारणं ठरू शकतो.

प्रायोगिक अभ्यासातून असंही समोर आलं आहे की, उच्च रक्तदाबामुळं मलेरिया ब्लड प्रेशर प्रणालीला प्रभावित करू शकतो. यानेच हार्ट फेलचा धोका होऊ शकतो.