वाढत्या सायबर क्राईममुळे पुणे पोलिसांनी उचलले ‘हे’ महत्वपूर्ण पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इंटरनेटमुळे जग जोडले गेले असले तरी त्याचा गैरवापरही तितकाच होताना दिसत आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सायबर चोरटे शोधणे हे एक आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या तपासात सुसुत्रता यावी, यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सायबर पोलीस ठाण्याची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार आता गुन्ह्याच्या स्वरुपानुसार 5 युनिटची स्थापना केली असून गुन्ह्यांच्या स्वरुपानुसार त्या त्या युनिटकडे संबंधित गुन्हे सोपविले जाणार आहेत. तसेच तपास अधिकाऱ्यांकडे एकाच प्रकारचे गुन्हे तपासासाठी दिले जाणार आहेत.

असे असणार 5 युनिट
1) हॅकिग / डाटा चोरी : डाटा इनस्कीप्ट, मेल हॅकिग, डाटा चोरी, डिजिटल सीगनेजर,

2) ऑनलाईन बिझनेस फ्रॉड : ओएलएक्स, फिप्लकार्ड फ्रॉड, मल्टी लेव्हल मार्केटिंग, हॅकिग मोबाईलर फार मनी टॉन्सफर, ऑनलाईन सेल ॲन्ड परचेस फ्रॉड आदी.

3) चिटिंग फ्रॉड : आनलाईन डेटिग साइट फ्रॉड, इन्शुरन्स फ्रॉड, जाब फ्रॉड, लोन फ्रॉड, पॅकेज टुर फ्रॉड, मोबाईल टॉवर फ्रॉड, मेट्रिमोनियल फ्रॉड आदी
4) सोशल नेटवर्किग : फेसबुक, फेक डॉक्युमेंट, फेसबुब हॅकिग एक्सट्रोशन, डिफमेशन, अपलोड व्हिडिओ आदी

5) एटीएम कार्ड फ्रॉड : मनी ट्रान्सफर डेबिट, क्रेडिट कार्ड, क्लोन कार्ड फ्रॉड, ओटीपी शेअर फ्रॉड, मोबाईल, लॅपटॉप चोरी आदी.
प्रशासन : पोलीस ठाण्याचे सर्व कार्यालयीन कामकाज, सायबर पोर्टल, पोलीस ठाण्यांना तांत्रिक सहाय्य.

अशा प्रकारची असणार रचना
वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या दिवशी प्राप्त सायबर तक्रारी अर्जाचे युनिटप्रमाणे अधिकाऱ्यांना वाटप करतील. युनिटचे पोलीस निरीक्षक सायबर तक्रारी अर्जाचे पुढील कार्यवाही करता व निर्गती करता त्यांचेकडील सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांना सूचना देऊन गुन्हा दाखल करण्याची, तपासाबाबत तसेच तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यांकडे पाठविण्याबाबत व तक्रारी बाबत चौकशीनंतर व दप्तरी दाखल करण्याबाबत पर्यवेशन करतील.