अतिरिक्त प्रवाशांमुळे पीएमपीएमएल बसचा पाटा तुटला- प्रवाशांची तारांबळ

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन 
पीएमपीएमएलच्या बसचा अतिरिक्त भार असल्याने पाटा तुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ झाली. ही बस मनपाकडून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जात असताना विद्यापीठ रोडच्या ई-स्क्वेअर थिएटर समोर आज सायंकाळी ही घटना घडली. बसची अवस्था बघता असेही लक्षात येते की, अनेक अशा बस आहेत ज्यांची अवस्था खूपच दयनीय आहे. शिवाय बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांची संख्याही क्षमतेपेक्षा जास्त असते. अनेकदा बसच्या दारापाशी बाहेर अनेक प्रवासी लटकलेल्या अवस्थेतही आढळून येतात.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0d5da51f-cbda-11e8-9fb8-ab1d37b56838′]

पाटा तुटलेल्या बसचा नंबर 322 (क) असून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणारी ही बस आहे. अचानक पाटा तुटल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ झाली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने या बसचा पाटा तुटला असल्याचे समोर आले आहे. दुरावस्था झालेली असूनही रस्त्यावर धावत आहेत अशा अनेक लाल आणि निळ्या रंगाच्या बस आहेत. विशेष करून बीआरटी मार्ग नसलेल्या मार्गांवरच अशा बस जास्त करून धावताना दिसतात. बस अचानक बंद पडल्याने प्रवाशांनाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. कारण अनेक प्रवासी हे नोकरी करणारे असतात शिवाय त्यांना आधीच सायंकाळी वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो. असे अनेक मार्ग आहेत ज्या ठिकाणी जाण्यासाठी बसची फ्रिक्वेंसी कमी आहे. याशिवाय अनेक शाळकरी मुलेही बसमध्ये असतात. त्यांना घरी जायला उशीर होतो. यामुळे त्यांच्या घरचेही मुलांची काळजी करतात. अशा प्रकारे सर्वच प्रवाशांना तारंबळीचा सामना करावा लागतो.

[amazon_link asins=’B01MZ6ER2J,B017WDVV3M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e34682f-cbda-11e8-b74e-15eb21e460c5′]
तसेही बस खराब होणे ही घटना काही नवीन नाही. अनेक ठिकाणी आपण बस खराब झाल्याच्या घटना पाहिल्या आहेत किंवा बहुतांश लोकांनी स्वत: या घटनेचा अनुभवही घेतला आहे. परंतु अनेक बसची अवस्था बघता असे लक्षात येते की, त्यांना मेंटेनन्सची गरज आहे. शिवाय बसमध्ये प्रवाशांच्या क्षमतेची मर्यादा आेलांडली जात आहे का असा प्रश्न येथे निर्माण होतो. दुरावस्था झालेल्या अनेक बस अजूनही रस्त्यावर धावताना दिसतात त्यावर त्यांना खरंच दुरुस्तीची गरज आहे की, त्या बस बदलण्याची गरज आहे असा प्रश्नही विचारला जात आहे.