कुल्लूमध्ये गाडी दरीत कोसळून भीषण अपघात, ११ जणांचा मृत्यू

कुल्लू (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यांतील रोहतांग जवळ असलेल्या राहनीनाला येथे स्क्रार्पियो गाडी दरीत कोसळून भिषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 पुरूष, 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f81e4ac9-a6bb-11e8-b163-0d748c63a873′]

हे सर्वजण मनाली येथून निघाले होते. मात्र प्रवासादरम्यान काल रात्री ही गाडी दरीत कोसळून अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरूवात केली असून, मृतदेह दरीतून काढले जात आहेत. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.