काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’मध्ये ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढली, जगभरात ‘प्रीमियम’ सुविधा केली ‘फ्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसची लाखो जणांना लागण झाली आहे तर हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक लोक आपआपल्या घरात आहेत. तर अनेक जण घरून काम करत आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे लोकांनी घरात राहणे पसंत केल्याने लोकप्रिय पॉर्न वेबसाइटनी त्यांच्या प्रीमियम सेवा विनामूल्य केल्या आहेत.

मीडियाच्यू रिपोर्टनुसार इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशानंतर जगभरात विनामूल्य सेवा देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी संपूर्ण महिनाभर प्रीमियम सेवा मोफत दिली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एवढेच नाही तर कंपनी आता आपल्या उत्पन्नाचा काही हिस्ता दान करणार आहे.

पॉर्न वेबसाईटची सुरुवात 2007 मध्ये झाली. पॉर्नहबने एक चार्ट देखील प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, लॉकडाऊन दरम्यान पॉर्न पाहणआऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. या वेबसाईटवरील ट्रॅफिक खूप वाढले आहे. पॉर्न वेबसाईटवर भारतात बंदी घातली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like