Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर देशातील जिल्हयांची 3 कॅटेगिरीमध्ये विभागणी : आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनची परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.15) आरोग्य व गृह मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशातील जिल्ह्यांना हॉटस्पॉट, नॉन-हॉटस्पॉट (जिथे कोरोनाची प्रकरणे पुढे येत आहेत) आणि ग्रीन झोन (जिथे एकही कोरोनाचे प्रकरण नाही) अशा तीन विभांगात विभागण्यात आले आहे.

हॉटस्पॉट जिल्हे असे आहेत त्याठिकाणी अधिक प्रकरणे समोर येत आहेत किंवा रुग्णांची संख्या अधिक वेगाने वाढत आहे. हॉटस्पॉटमध्ये 170 जिल्ह्यांना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात केले जातील. तसेच हॉटस्पॉट नसलेले 207 जिल्हे आहेत. लव अग्रवाल म्हणाले की, कॅबिनेट सहसचिवांसह मुख्य सचिव, डीजीपी, आरोग्य सचिव, डीएम, एसपी, महानगरपालिका आयुक्त आदींची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. यामध्ये हॉटस्पॉटवर चर्चा झाली आणि कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या रणनितीवर चर्चा झाली. जिल्ह्यांना कोरोना रुग्णालय, कोरोना केअर सेंटर, सौम्य प्रकरणांसाठी आणि कोरोना हेल्थ सेंटर आणि गंभीर प्रकरणांसाठी कोरोना हेल्थ सेंटर, नाजुक प्रकरणासाठी कोरोना रुगणालय (ज्या ठिकाणी व्हेंटीलटर उपलब्ध असतील) बनवण्यात येणार आहे.