Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे जेजुरीची सोमवती यात्रा पहिल्यांदा रद्द

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेरायाची सोमवती यात्रा दिनांक २३ मार्च २०२० होणार नाही. दि.२३ मार्च रोजी खंडोबा देवाची सोमवती अमावस्या पालखी सोहळा हा सूर्योदया नंतर दुसऱ्या प्रहरात अमावस्या प्रारंभ होत असल्या कारणाने पालखी सोहळा होऊ शकत नाही. तसेच कोरोना या भयंकर रोगाचे सावट असल्या कारणाने सदर यात्रा रद्द करण्याची मागणीही देवस्थांकडून करण्यात आली. या सर्व गोष्टींचा विचार करून सोमवती अमावस्या, पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. याची सर्व खंडोबा भक्तांनी नोंद घ्यावी. तसेच जेजुरी गडावर महाराष्ट्र राज्य व राज्याबाहेरून तसेच देश- विदेशातून भाविक दर्शनासाठी येत असतात संथानकडून खबरदारी म्हणून गडावर उपाय योजना सुरू केल्या आहेत.

सदर पालखी सोहळा संदर्भातील मीटिंग पेशवे वाडा जेजुरी येथे पार पडली. सदर मिटींगला खंडोबा देवाचे मुख्य मानकरी श्री राजाभाऊ पेशवे, खांदेकरी मानकरी अध्यक्ष गणेश शेठ आगलावे, देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त संदीप आप्पा जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, विश्वस्त पंकज निकुडे, शशिकांत सेवेकरी गुरुजी, रमेश आबा राऊत, पत्रकार प्रकाश खाडे, छबन कुदळे, जालिंदर खोमणे, अमोल शिंदे, दत्ता सकट, किसन कुदळे, सीताराम दोडके, अरुण अण्णा खोमणे, राजाभाऊ खाडे, माणिक पवार, रसिक जोशी, रोहिदास जगताप, वसंत शिंदे, खंडूअण्णा काकडे, माधव बारभाई, काळूराम थोरात, सतीश दोडके समस्त ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, गावकरी उपस्थित होते.