Coronavirus Lockdown : ‘कोरोना’मुळं ‘या’ कंपन्यांना बसला मोठा फटका, पगारात 35% होणार कपात

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   कोरोना व्हायरसने जगभरातील अर्थव्यवस्थांना नुकसान पोहोचविणे सुरु केले आहे. देशात कोरोनाचा फटका बसल्यामुळे इंडिया इन्क. म्हणजेच भारताच्या कॉरपोरेट कंपन्यांच्या व्यवस्थापनाने वेतनातून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने वेतनात सरासरी 35 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने सांगितले कि, सध्याच्या आर्थिक वर्षात ही वजावट होईल. ही वजावट कोविड -१९ च्या कारणामुळे झाली असली तरी ती नोंदविली गेली नाही. ही कपात खर्च नियंत्रित करण्यासाठी करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. कंपनीचे चेअरमन समीर गहलोत पूर्ण पगार घेणार नाहीत, तर कंपनीचे उपाध्यक्ष, एमडी आणि सीईओ गगन बंगा यांना पगारामध्ये 75% कपात करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने त्यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला कोटक महिंद्रा बँकेचे एमडी उदय कोटक यांनी चालू आर्थिक वर्षात फक्त एक रुपयांचा पगार घेण्याची घोषणा केली होती आणि सर्व वरिष्ठ व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या पगारामध्ये 15% कपात करण्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे इंडिगो या विमान कंपनीनेही अव्वल व्यवस्थापनाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात कोरोना विषाणूच्या साथीमुळे झाली असली तरी, इंडियाबुल्सने त्याविषयी माहिती दिली नाही.