Corona Alert : राजधानी दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत राहणार बंद, सरकारनं दिला आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दिल्लीत या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे दिल्ली सरकारने काही दिवस राजधानीतील सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. यासंबंधित माहिती मनीष सिसोदिया यांनी ट्विटरवरुन दिली. ते यात म्हणाले की वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आणि खबरदारी म्हणून प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद असतील.

बॉयोमेट्रिक अटेंडेस होणार नाही –
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी दिल्ली सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत. आता सरकारी कार्यालयात बायोमॅट्रिक अटेंडेंसची आवश्यकता भासणार नाही. जेणे करुन या आजारापासून वाचता येईल.

केंद्राने देखील उचलली पावले –
दिल्लीचे आरोग्य मंत्री सतेंद्र जैन गुरुवारी लोक नायक जयप्रकाश रुग्णालयाची भेट घेणार आहेत. यावेळी ते कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी काय तयारी आहे याची तपासणी करतील. केंद्र सरकारने देखील तत्परता दाखवली आहे. गुरुवारी संसदीय समितीची बैठक संसद भवनात होत आहे. आरोग्य मंत्रालयाचे आधिकारी या समितीसमोर प्रेजेंटेशन देत आहेत.

गाजियाबादमध्ये देखील एक कोरोनाग्रस्त –
एनसीआरमध्ये आणखी एक कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळला आहे. माहितीनुसार गाजियाबादमध्ये कोरोना व्हायरसने बाधित एका व्यक्तीची ओळख झाली आहे. अधिकृत माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 30 झाली आहे.