पाय घसरल्याने विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – पाय घसरून विहीरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्रकार तालुक्यातील कुंडाणे गावात मंगळवारी घडला. प्रकाश पाटील असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

प्रकाश पाटील हा मंगळवारी सकाळी शेतातील विहिर जवळ गेला असता अचानपणे पाय घसरुन तो विहिरीतील पाण्यात पडला. त्याने आरडाओरडा केल्यावर जवळ पास शेतात काम करणारे मजुर व शेतकरी यांनी धाव घेतली. पाण्यात पडलेल्या प्रकाश पाटील याला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या मारुन काही वेळात त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारार्थ चक्करबर्डी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.

परंतु उपचार सुरु असताना प्रकाश पाटील याचा मृत्यू झाला. कुंडाणे गावातील अमरधाम मध्ये सायंकाळी उशीरा प्रकाश पाटील यांचेवर अंत्यसंसार करण्यात आले. यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.