जोरदार पावसामुळे पुणेकरांची ‘पळता भुई थोडी’, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद …!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आज सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून १६,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे डेक्कन येथील बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सायंकाळी सहापर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्यामुळे या कालावधीत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल.
[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76ee8262-88e9-11e8-a909-db0b976ed467′]

याबाबत मिळाली अधिक माहिती अशी की, आज सकाळी साडे आठ ते साडेअकरा या तीन तासात पुण्यात ११.२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर सतत चालू राहिला तर भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्याता आहे.

सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून १६,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे डेक्कन येथील बाबा भिडे पुलावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. सायंकाळी सहापर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने या कालावधीत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. दरम्यान, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरून रस्त्यावरील वाहने हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ४ वाजेपर्यंत मुठा नदीवरील नांदेड पूल पाण्याखाली जाणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.
[amazon_link asins=’B079H2P3PK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7da3e309-88e9-11e8-babf-3b81995a50c2′]

आज सकाळी खडकवासला धरणातून ५१३६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे १६,००० क्युसेक पाणी सोडण्यात आले.  हे पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. परिणामी भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच जिमखाना आणि संभाजी उद्यानाच्या मागील बाजूस सुरु असलेले मेट्रोचे काम थांबवण्यात आले आहे. पण पाण्याचा विसर्ग थांबल्यानंतरच मेट्रोचे काम पुम्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणारआहे. जर पावसाचा जोर कमी झाला तर कमी पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

पालिकेकडून सावधानतेचा इशारा

पुण्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे महापालिकेने सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे. एका परिपत्रकाद्वारे पालिकेने हे जाहीर केले आहे. या परिपत्रकात म्हंटले आहे की, अतिवृष्टी झाल्यानंतर नाल्यांना व नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच नदीच्या पुरामुळे नाल्यातील पाण्याला फुगवटा येण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी. अशी विनंती करण्यात आली आहे.

नदी नाल्यालगत पूररेषा असलेल्या घरे /झोपड्या स्वतःहुन काढून घ्याव्यात असे आवाहन केले आहे. नदी नाल्याच्या पात्रात जाऊ नये. डोंगरातील, खाणीतील असलेल्या घरे /झोपड्पट्टयांवर दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच विजेच्या खांबांपासून व तुटलेल्या तारांपासून सुरक्षित अंतर राखावे. नदीलगत असलेल्या एखाद्या इमारतिच्या भिंतींवर लाल रंगाने धोक्याची पातळी गाठली असेल तर त्वरित जिल्हाधिकारी कार्यालयाला संपर्क करावे.
असे आवाहन केले आहे.

पुणे महापालिका पूरनियंत्रण कक्ष महापालिका भवन दूरध्वनी क्रमांक

पूरनियंत्रण कक्ष –०२०-२५५०६८००/१/२/३/४(२४ तास )
अग्निशामक दल –१०१
सुरक्षा रक्षक दल –०२०-२५५०११३३/३०