ब्रेकिंग न्यूज : पुणे शहरासह जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी : जिल्हाधिकारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : मागील ३ दिवसांपासून पुण्यात दररोज रात्री मुसळधार पाऊस होत आहे. अशातच २५ सप्टेंबर रोजी मात्र पावसाने कहर केला. या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी जीवित आणि वित्तहानी झाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये उद्या २७ सप्टेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

या ५ तालुक्यांमध्ये सुट्टी जाहीर :
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी लाहिरी केल्यानुसार पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या पाच तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना उद्या शुक्रवार दि. २७ सप्टेंबर २०१९ रोजी सुट्टी असणार आहे.