आयुक्तांचा अंकुश नसल्याने शहराचे बकालीकरण खासदार बारणे यांचा आरोप

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

शहरातील रस्त्यावरील खड्डे, मुख्य चौकात असलेले अतिक्रमण, कचऱ्याचे साम्राज्य, ड्रेनेजच्या समस्या यामुळे शहराचे बकलीकरण झाले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा अंकुश नसल्याने शहराचे बकलीकरण झाले असल्याचा आरोप खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.
[amazon_link asins=’B077RV8CCZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1f986481-a6f1-11e8-a048-edd0ab67b542′]

खासदार बारणे यांनी शहरातील विविध प्रश्नांवर आयुक्त श्रवण हार्डीकर यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष

योगेश बाबर, नगरसेवक निलेश बारणे, प्रमोद कुटे, सचिन भोसले, नगरसेविका अस्विनी चिंचवडे, जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे उपस्थित होते. शहरातील अतिक्रमण विभागाला सक्षम अधिकारी नाहीत. त्यामुळे चौका चौकात हातगाड्या उभा असतात, हातगाड्यांचा व्यवसाय झाला असून अनेकजण हातगाड्या भाड्याने देत आहेत. या हातगाड्यांवर कारवाई करणाऱ्यांवर राजकीय दबाव येत आहे. कारण राजकीय वरदहस्त असणारे स्थानिक गुंड त्यांच्याकडून हप्ते वसूल करत आहेत.

शहरातील अनेक भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. पाण्याची अनधिकृत कनेक्शन, लिकेज असल्याची कारणे अधिकारी देत आहेत. मात्र अशी कनेक्शन कट करण्याचे धाडस अधिकारी करत नाहीत. शहरातील पाण्याच्या मोठ्या पाईप लाईन बदलण्यासाठी केंद्राने पाठीमागे मोठा निधी दिला होता. मात्र तरीही त्या बदलेल्या गेल्या नाहीत. महापालिका ठेकेदार पोसण्याचा उद्योग करत आहे. पालिकेचे अधिकारी निर्दावले आहेत.
[amazon_link asins=’B00SAX9X6G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2608f325-a6f1-11e8-adaf-5fff340e047a’]

रस्त्यावर खड्डे हे पावसामुळे पडले असल्याचे सांगण्यात येते. मात्र खड्याला पाऊस हा पर्याय होउ शकत नाही. प्रत्येक वर्षी पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडतो. मात्र रस्त्याच्या कामाचा दर्जा ढासळला आहे. त्यामुळे खड्डे पडत आहेत. आयुक्तांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. महापालिकेत जनतेच्या पैशाची लूट सुरु असून सत्ताधारी पक्ष फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. सत्ताधारी पक्षाची परदर्शकता राहिलेली नाही.पालिकेत संगनमत करुन निविदा भरल्या जात असल्याचा आरोपही बारणे यांनी केला. तसेच केंद्र शासनाच्या योजना संदर्भात पुन्हा एकदा आयुक्तांशी मिटिंग घेणार असल्याचेही बारणे यांनी सांगितले.