अपेक्षित थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित न केल्याने वितरकांना चोपले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच प्रदर्शित झालेल्या कॉलेज डायरी सिनेमा अपेक्षित थिएटरमध्ये प्रदर्शित न झाल्याने कलाकारांनी वितरकांना चोप दिल्याचा प्रकार जंगली महाराज रस्त्यावर घडला. चित्रपटाला अपेक्षित थिएटर्स न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान झाले असे चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माता अनिकेत घाडगे यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कलाकार किंवा वितरकांनी पोलिसांत अद्याप तरी तक्रार दिलेली नाही.

मागील शुक्रवारीच कॉलेज डायरी हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा राज्यातील 100 थिएटरमध्ये दाखविण्याचे आश्वासन वितरक असलेल्या योगेश गोसावी आणि सचिन पारेकर यांनी निर्मात्यांना दिले होते. बुधवारी रात्री केवळ 30 थिअटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल असे सांगण्यात आले. सांगितलेल्या थिएटरच्या संख्येपेक्षा ही संख्या निम्मी देखील नाही. चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला परंतु त्याला योग्य वेळा दिल्या गेल्या नाहीत. वितरकांशी अनेक दिवसांपासून संपर्क केला जात होता. परंतु ते प्रतिसाद देत नव्हते.

ह्याहि बातम्या वाचा

तुमच्या पवार साहेबांनी ‘यांना’ कळा सोसून जन्माला घातले का ? ; ‘या’ नेत्याचे वक्तव्य

सुजय विखे Is in trending पण…

‘ते गांधी सत्याच्या मार्गावर चालायचे हे गांधी खोट्याच्या मार्गावर चालतात’

#BJP : ऑपरेशन ‘अहमदनगर’ सक्सेसनंतर आता भाजपचे ऑपरेशन ‘माढा’ काय आहे OPERATION माढा हे वाचा सविस्तर