‘या’ खासदार महिलेच्या बहिणीचं 5 मिनीटांमुळे आमदार बनण्याचं स्वप्न भंगलं,जाणून घ्या

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत अनेक इच्छूक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काही इच्छूकांनी उमेदवारांनी पक्षाकडून तिकीट मिळाले नसल्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने अनेकांनी आपले अर्ज दाखल केले. मात्र, अक्कलकुवा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुप्रिया गावीत यांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात जाण्यासाठी पाच मिनीटे उशीर झाल्याने त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारला.

डॉ. विजयकुमार गावीत यांची कन्या आणि खासदार डॉ. हिना गावीत यांच्या लहान बहीण व अक्कलकुवा मदारसंघातून इच्छूक उमेदवार डॉ. सुप्रिया गावीत विधानसभेसाठी इच्छूक होत्या. त्यांना शिवसेनेने एबी फॉर्म दिला होता. आज त्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची वेळ निघून घेल्याने त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारला. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ तीन वाजेपर्यंत होती. परंतु सुप्रिया गावीत या तीन वाजून पाच मिनीटांनी कार्यालयात आल्या होत्या.

पाच मिनीटे उशीरा आल्याने सुप्रिया गावीत यांना अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारला. त्यामुळे त्यांना निराश होऊन कार्यालयाच्या बाहेर पडावे लागेले. उशीरा आल्याने त्यांना आपला उमेदवारी अर्ज भरता न आल्याने त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न राहून गेले. तर त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता न आल्याने शिवसेनेला त्या ठिकणी धक्का बसला आहे.