धक्‍कादायक ! रस्त्याचे निकृष्ट काम केल्याने ‘त्यांनी’ अधिकार्‍यांनाच बांधलं पुलाला

खेड : पोलीसनामा ऑनलाइन – उद्घाटनापूर्वीच मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा जोड रस्ता खचल्यामुळे संतप्त नागरिकांनी मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि महामार्ग विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना काहीवेळ त्याच पुलावर बांधून ठेवले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर या अधिकाऱ्यांना सोडण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जगबुडी नदीवरील जुन्या पुलाशेजारी हा नवीन पूल बांधण्यात आला आहे. येत्या काही दिवसात या पुलावरून नियमित वाहतूक सुरू करण्यात येणार होती. मात्र त्याआधीच या पुलाचा जोड रस्ता खचला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली आहेत.

जोडरस्त्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच आमदार संजय कदम व खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तात्काळ भरणे येथे धाव घेऊन पुलाची पाहणी केली. यानंतर निकृष्ठ कामाचा व पाठिशी घालणाऱ्या प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी भरणे नाका येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

त्याचवेळी तेथे आलेले कार्यकारी अभियंता (हायवे) बामणे व उपअभियंता गायकवाड या अधिकाऱ्यांना नवीन जगबुडी पुलाला बांधण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे लगेचच त्यांची सुटका झाली.

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

पावसाळ्यात करू नका फिटनेसकडे दुर्लद्व ; करा ‘हे’ उपाय

पुण्यातील ७२ वर्षांच्या आजीने किडनी दान करून वाचवले ‘त्याचे’ प्राण