चपाती करपली म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक

लखनाैः वृत्तसंस्था-

स्वयंपाक करत असताना चपाती करपल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला घटस्फोट दिल्याचा गंभीर प्रकार उत्तर प्रदेशातील एका गावात घडला आहे. येथील महोबा जिल्ह्याच्या खरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी काैटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल करण्याचे आदेश संबंधित पोलिसांना देण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’db4fa051-8432-11e8-9104-8de416192d6c’]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहरेथा गावातील 24 वर्षीय रजिया आणि निहाल यांचा 4 जुलै 2017 रोजी विवाह झाला होता. मात्र वर्षभरातच त्यांच्या संसारात कटुता निर्माण झाली. याप्रकरणी पत्नी रजियाने पोलिसात तक्रार दाखल करुन पतीवर गंभीर आरोप केले आहेत. एवढेच नाही तर निहालने तलाक देण्याच्या तीन दिवसापूर्वींच जळालेल्या सिगारेटने अंगावर चटके दिले आहेत. तर स्वयंपाक करताना चपाती करपली म्हणून मला तलाक दिला, असे रजियाने तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत रजियाने  प्रथम स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, तेथील पोलीस अधिकाऱ्याने तिला रागवत तेथून हाकलून दिले. त्यानंतर तिने जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कानावर आपल्या सोबत झालेल्या अत्याचाराची कहाणी मांडली.  दरम्यान, सर्वेच्च न्यायालयाने तिहेरी तलाक पद्धती रद्द केली असून, भारतीय न्यायव्यवस्थेत हा प्रकार बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे.
[amazon_link asins=’B01MU7ZZJV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5133398e-8433-11e8-92af-995c3b3ac285′]