‘त्या’मुळे अजित पवारांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक ‘दहन’ !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम कालावधी राहिलेला असताना आता राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. सोलापुरात भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर तोंडसुख घेताना खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पुतळा नाशिकमध्ये जाळण्यात आला आहे.

अजितदादा पवारांच्या टिकेचे पडसाद नाशिकमध्ये उमटले आहेत. नाशिकच्या भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे नविन नाशिक परिसरात दहन करून कार्यकर्त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. यावेळी अजित पवार यांच्या विरुद्ध घोषणाबाजी देत तीव्र निषेध करण्यात आला. सोलापुरात शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलताना गिरीश महाजन यांच्यावर अजित पवार यांनी टिका केली होती . गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांचा नाशिक जिल्ह्यात राजकीय दबदबा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like