विरोधकांच्या आरोपांमुळे दानवेंचे मानसिक संतुलन बिघडलेय : अशोक चव्हाण

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या डोक्याच्या पलीकडले राफेल प्रकरण आहे. दानवे यांना रोज जावई शोध कुठून लागतात तेच कळत नाही, त्यांनी केवळ आपल्या लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष द्यायला हवे. राफेल आहे की, रायफल हेच दानवे यांना समजत नाही. विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांचे मानसिक संतुल बिघडले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त नाशिक काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. काँग्रसेमुळे पेट्रोल दरवाढ, राफेल विमान घोटाळयात काँग्रेस नेतेच अडकले, जनसंघर्ष यात्रेचा भाजपला फायदा अशी विधानं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली होती. त्यांच्या या विधानांचा अशोक चव्हाण यांनी यावेळी समाचार घेतला. पत्रकार परिषदेस विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. तुषार शेवाळे, भारत टाकेकर आदी उपस्थित होते.

[amazon_link asins=’B079PYHMN2,B07CDQX2ZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac3032b4-b967-11e8-9046-db35d05605f5′]

चव्हाण म्हणाले, भाजप सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रापासून संघर्ष यात्रेला सुरूवात केली, महागाई, इंधन दरवाढ याची उत्तर सरकारने द्यायला पाहिजे. मात्र सरकारचे यावर मौन साधले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासाठी काढलेल्या शासन आदेश रद्द करण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. यात शेतकरी व व्यापाऱ्यांना मारायचे धोरण सरकारचे आहे. किमान आधारभूत किंमत सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची सरसंघचालकांशी चर्चा?

भरिप बहुजन महासंघ व एमएएमच्या आघाडीबाबत चव्हाण म्हणाले की, आंबेडकर यांनी घाईघाईत निर्णय घेऊ नये. त्यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांनी महाआघाडीत सामील व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून, पक्षांशी चर्चाही केली जात आहे. आंबेडकर यांच्या भरिप बहुजन आघाडीशी चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीबाबत चर्चेची पहिली फेरी झाली आहे. जागावाटपाबाबत लवकर बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. राज्यात काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ओबीसी आरक्षण कमी करण्याचा घाट सरकारकडून सुरू  आहे. आम्ही आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आणि आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून सुरू आहे. याबाबत सरकारने तात्काळ खुलासा करावा, असे चव्हाण म्हणाले. यावेळी चव्हाण यांनी जावडेकर यांच्या वादग्रस्त विधानाचाही निषेध केला.

पुढील पाच वर्षांसाठीही मीच मुख्यमंत्री : फडणवीस