मुठा कालवा फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

मुठा कालवा फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली. या कालव्याची दुरुस्ती होण्याकरीता दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

लष्कर भागातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या परिसराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यामध्ये कोंढवा, मुंढवा, हडपसर, महंमद वाडी, काळेपडल, येरवडा, कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदननगर, नगररोड, विमाननगर या भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c31b1c3b-c261-11e8-ad9c-edf58497433d’]
तर कालवा फुटल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत आवश्यक ती मदत करणार असल्याचं आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिलंय. दरम्यान, या घटनेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या प्रकरणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचे वाभाढे काढले.

सिंहगड रोडवरील वाहतूक सुरु पर्वती येथे मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. दांडेकर पूल वसाहत आणि सिंहगड रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते खबरदरीचा उपाय म्हणून पोलिसांनी सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळविल्याने शहरातील मध्यवस्तीमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, पाणी ओसरु लागल्याने सिंहगड रोडवरील वाहतूक सुरु करण्यात आली. दांडेकर पुलाजवळ गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास कालवा फुटल्याने त्याचे पाणी वेगाने वाहून सिंहगड रस्त्यावर आले. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलापासून सिंहगडकडे जाणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. दांडेकर पुलाच्या चौकातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने हा चौकातील वाहतूकही बंद पडली. त्याचा परिणाम होऊन सारसबागेकडून येणारी पूर्णपणे थांबली. त्यामुळे वाहनांच्या रांगा सारसबागेपर्यंत गेल्या. पाठोपाठ मित्रमंडळ चौक, पर्वती दर्शन या भागात वाहतूक कोंडी झाली होती.

[amazon_link asins=’B01G5I8YLC,B077RTXJ66′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’00835293-c262-11e8-abb3-952a88e32c71′]

मुळा कालवा फुटला, दांडेकर पुल पाण्याखाली