Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे ठरत नाहीत लग्न, नियोजित वधू-वरांचा ‘मूड ऑफ’ !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना संसर्गामुळे बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारच्या वतीने गर्दी न करण्याचे तसेच शाळा, महाविद्यालये बंद ठेवाण्याचे व सार्वजनिक कार्यक्रमांना देखील बंदी करण्यात आली आहे. याचा फटका लग्न-सोहळे, स्वागत समारंभाना देखील बसला आहे.

मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड, नांदगाव, सटाणा तसेच नाशिकच्या ग्रामीण भागात ३१ मार्च पर्यंत होणारे सर्व लग्न व स्वागत समारंभ ऐन वेळी रद्द केल्याने भावी वधू-वरांचा हिरडमोड झाला आहे. तर काहींनी लग्न आणि स्वागत समारंभाच्या तयारीसाठी केलेला खर्च देखील वाया गेला आहे.

याबाबत, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कोरोनामुळे ३१ मार्च पर्यंत सर्व लग्न आणि स्वागत समारंभावर बंदी घातली आहे. याची अंमलबजावणी नागरिकांनी स्वतःहून करत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केल्यास कारवाई
राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातले असताना जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर प्रतिबंध आणि सुरक्षित पुरवठा अधिनियम १९८० तरतुदीनुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

भुजबळ म्हणाले, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा असल्याचे भासवून त्याचा साठा करून तो वाढीव भावाने विक्री करणे अशी परिस्थिती निर्दशनास येत असल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ व त्यानुसार निर्गमित इतर नियंत्रण आदेश, तसेच जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम १९८० मधील तरतुदींनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंमध्ये अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार व संबंधित व्यक्ती यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

केंद्र शासनाच्या १३ मार्च २०२० च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या परिशिष्टामध्ये कलम २ ए अंतर्गत ‘मास्क व हॅन्ड सॅनेटाइझर’ यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. याचा काळा बाजार व साठेबाजी करणाऱ्याविरोधातही कठोर कार्यवाही करण्यात येईल भुजबळ यांनी सांगितले.