शेतकऱ्याला उशीरा वीज जोडणी दिल्याने महावितरणला १२ लाखांचा दणका 

उस्मानाबाद: पोलीसनामा आॅनलाईन

शेतकऱ्याच्या फसवणूकीचा नवीनच प्रकार समोर आला आहे. महावितरणने वीज जोडणीबाबत एका शेतकऱ्याची फसवणूक केली आहे, मात्र महावितरणला याची चांगलीच शिक्षा भेटली आहे. महावितरणला आर्थिक दणका बसला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील हे शेतकरी आहे. या शेकऱ्यांच्या वीज जोडणीला चक्क ५३२ दिवस म्हणजेच दीड वर्ष उशीर करत शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. या बदल्यात त्या शेतकऱ्याला १२ लाख मिळावे असे आदेश महावितरणाला देण्यात आला आहे. राष्ट्रीय ग्राहक मंचाने महावितरणला चांगलाच दणका दिला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32435968-c8aa-11e8-96b7-e78982cdfbdf’]

उस्मानाबाद जिल्ह्यात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव प्रकाश राऊत अाहे. राऊत यांनी शेतीसाठी वीज जोडणी मागितली होती. यासाठी २००९ साली त्यांनी डिमांड ड्राफ्टही भरला होता. अखेर त्यांना वीज जोडणी ही तब्बल ५३२ दिवसांनी म्हणजेच दीड वर्षांनी मिळाली. त्या संदर्भात राऊत यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे केस दाखल केली. राऊत यांना जिल्हा ग्राहक मंच, राज्य ग्राहक मंच तसेच राष्ट्रीय ग्राहक मंच अशा सर्वच ठिकाणी यश मिळाले. निकाल राऊत यांच्या बाजूने लागला.

महावितरणचा असा दावा होता की, वीज जोडणीसाठी राऊत यांना ३१-११-११ ही तारीख देण्यात आली होती, प्रत्यक्षात ३१ नोव्हेंबर अशी तारीखच नसल्याने महावितरणची फसवेगिरी सहज समोर आली. राऊत यांच्या बाजूने निकाल लागल्याने, जोडणी देताना जवळपास दीड वर्ष उशीर झाल्याने दिवसाला एक हजार याप्रमाणे चार लाख ३० हजार रुपये दंड तसेच या रकमेवर ९ टक्के व्याज लावून प्रकाश राऊत यांना १२ लाख रुपये मिळणार आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’382abb62-c8aa-11e8-9a16-65ba2677be4a’]

आपल्या फसवेगिरीबद्दल महावितरणला चांगलाच दंड सोसावा लागत आहे. परंतु शेतकरी प्रकाश रऊत यांना आपल्या नुकसानीचा मोबदलाही मिळाला आहे.

PUNE जुना बाजार दुर्घटना प्रकरण : पत्नीच्या अस्थी विसर्जित केल्या अन…….