भरधाव वेगात डंपर शिरला घरात, एकाच कुटूंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशः वृत्तसंस्था

वाळूने भरलेला डंपर चालवत असताना चालकाचा ताबा सुटल्याने वेगवान डंपर घरात घुसला, या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कानपूरमध्ये घडली आहे. हा अपघात एवढा भयानक होता की यामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मतदीने या 6 जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या अपघातामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सदरची घटना इलाहाबादच्या महामार्गावरील महाराजपूर पोलीस स्थानकाजवळ घडली
आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपरचा ड्रायव्हर नशेत होता. त्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी घरात घुसली. अपघातानंतर ड्रायव्हर घटनास्थळावरुन फरार झाला आहे. या अपघातात एका वृद्ध महिलेसह घरात झोपलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.