गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळेच झाला दहशतवादी हल्ला

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हा सैन्यावर झालेला आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. गुप्तचर विभागाच्या ढिलाई मुळेच हा हल्ला झाला आहे. नोटबंदी करून दहशतवादाचे कंबरडे मोडण्याची भाषा बोलणाऱ्या सरकारच्या काळात सर्वात जास्त दहशतवादी हल्ले झाले आणि सर्वात जास्त जवान शहीद झाले असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. मनमाड येथे ते एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

पुलवामा दहशतवादी हल्ला हा देशावर आजवर झालेला सर्वात मोठा हल्ला आहे आणि गुप्तचर विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा हल्ला झाला आहे अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. हल्ला होणार आहे अशी माहिती असताना देखील सतर्कता का बाळगली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच गाडीतून जवानांना घेऊन जाणे योग्य होते का असे सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केले आहेत. काही हि झाले तरी या मुद्द्यात आम्ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. अशा दहशतवादी हल्ल्याचा आपण सर्व भारतीयांनी एकत्रित मुकाबला केला पाहिजे असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

नोटबंदीचा काहीच फायदा या देशाला झाला नाही. उलट त्यामुळे दशहतवाद वाढीस लागला आहे. आगामी काळात पाकिस्तानवर दबाव आणावा आणि व्यावसायिक संबंध तोडून टाकावे असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. देश शहिदांच्या बलिदानवर आक्रोश करत आहे.तर पंतप्रधान आणि भाजपचे नेते विकास कामांचे उदघाटन करण्यात व्यस्थ आहेत असा टोला देखील छगन भुजबळ यांनी भाजपाला लगावला.