बामनोली तापोळ्याला जोडणाऱ्या शासकीय लाँच मुळे गोर गरिबांचे ‘हाल’ तर कर्मचारी घरी बसून ‘लाल’

कुडाळ : वृत्त संस्था – कोयना जलाशयाच्या कांदाटी सोळशी व कोयना खोऱ्यातील नागरीकांना दळणवळणाच्या मुख्यप्रावाहात आणणारी व दळणवळणाचे प्रमुख साधन असणाऱ्या शासनाच्या प्रवासी वाहतुक लाँच बंद असल्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसापासून गोरगरीब जनतेचे हाल होऊ लागले आहेत तर कर्मचारी घरी बसून लाल होताना दिसत आहेत.

सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरीणा ने आहाकार माजवला असल्या कारणामुळे अलीकडच्या आणि पलिकडच्या गावांना जोडणारी लॉन्च बंद असल्या मुळे अनेक गोरगरिबांना नाहक पैसे देत प्रवास करण्याची वेळ आली असून यामुळे किरकोळ सर्दी तापासाठी सुद्धा लोकाना हजारो रुपये मोजण्याची वेळ आली असून प्रायव्हेट लॉन्च वाल्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होत असून संबंधित लोकांचे मात्र नुकसान होताना दिसत आहे यामुळे सरकारी लॉन्च लवकरच सुरू करण्याची आता मागणी होऊ लागली आहे त्यामुळे जिल्हा परिषदेने तात्काळ संबंधित लॉन्च सुरू करून गोरगरीबांना दिलासा देण्याची गरज आहे अशी मागणी भागातील नागरीकांतुन व्यक्त्त होत आहे

कोयना जलाशयाच्या पलिकडे कांदाटी सोळशी कोयना खोऱ्याच्या अतिदुर्गम भागात अनेक गावे वास्तव्य करत असुन अनेक गावात अदयाप वाहतुकीसाठी रस्तेच पोहचले नाहीत त्यामुळे त्यांच्या दळणवळणासाठी व बाजारपेठेत दवाखान्यात येण्यासाठी जिल्हा परिषदे कडुन कोयना नदी मध्ये तिन विभागामध्ये तिन शासकीय लाँचची व्यवस्था केली आहे मात्र प्रवासी लाँच कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासुन बंद असल्याने दुर्गम भागातील जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे

लॉकडाऊन मध्ये बंद असणाऱ्या एसटी बसेस सह अन्य प्रवासी वाहने राज्यभरात सुरू झाली असल्याने थोडा का होईन दळणवळणाला वेग आहे मात्र दुर्गम कादांटी खोऱ्यासह कोयना सोळसी खोऱ्यात प्रवाशांची वाहतुक करणाऱ्या शासकीय लाँच बंद असल्याने नागरीकांना जिवन आवश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी व आजारी पडल्यास बामणोली तापोळा येथील दवाखान्यात येण्यासाठी मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे शासनाच्या प्रवासी लाँच ला जिते विस तिस रूपये तिकीट आकारले जाते तिथे नाईलाजास्तव खाजगी लाँचला हाजारो रुपये भाडे दयावे लागते लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरीकांचे अधिच कंबरडे मोडले असुन अर्थीक कोंडी झाली आहे त्यामुळे जिल्हाप्रशासनाने तात्काळ शासकीय प्रवासी लाँच सुरु कराव्यात यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळणार आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून आता अनेक वर्षे उलटून गेली मात्र तरीदेखील या विभागांमध्ये ज्या पद्धतीने विकासाची गंगा पोहोचायला हवी होती त्या पद्धतीने पोहोचली नसल्या कारणामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची मोठी कोंडी होत आहे या लोकांना रस्ते वीज व अन्य दळणवळणाच्या साधनां साठी अजूनही झगडावे लागत आहे याला नेमके जबाबदार तरी कोण असाही प्रश्न या कांदाटी खोऱ्यातल्या लोकांना आजही पडत आहे एकतर जंगल त्यातच या भागात व्यवसाय नाही या भागामध्ये अनेक वन्य प्राण्यांचा वावर भरपूर पाऊस अशा अनेक समस्या या लोकांना वेळोवेळी भेडसावत आहेत त्यामुळे या कोरोणाच्या महामारीत हातावर पोट असणाऱ्या या विभागातील लोक आता पुरते बेजार झाले असून तात्काळ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असणाऱ्या बोटी जर चालू झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभे राहण्याचं चिन्हे आता दिसू लागली आहेत

सर्वात अतिदुर्गम कांदाटी खोरे असुन या विभागातील नागरीकांची शासकीय प्रवासी लाँच विना मोठी अडचण होत आहे अनेकांना दवाखान्यात बाजारपेठेत येण्यासाठी मोठा आर्थीक भुर्दंड सोसावा लागत आहे मागील महिन्यात सुरु झालेली लाँच सेवा कोनाच्या तरी सांगण्यावरून आठ दिवसात कोरोनाच्या भिती पोटी पुन्हा बंद करण्यात आली मात्र शासकीय लाँच शिवाय नागरीकांना पर्यायच नसुन प्रशासनाने तात्काळ तिनही प्रवासी लाँच सुरु कराव्यात.

कोयना जलाशयात प्रवासी वाहतुक करणारी शासकीय लाँच

संबंधित प्रवासासाठी नेमून क असलेले कर्मचारी गेल्या 4 महिन्यात पासूम घरीच बसून पगार मोजत आहेत याच कर्मचाऱ्यांच्या आळशी पणा मुळे व कोरोना चे कारण अधिकाऱ्यांना सांगत लोकांना आरोग्यासेवे पासून हेच कर्मचारी वंचित ठेवत असून संबंधित जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या विभागातल्या लोकांकडून माहिती घेऊन अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे