भाजपच्या अधिकाऱ्यांवरील रोषामुळे पुण्यात अजून ‘विकास’ रांगेनाच !

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

राज्यातील सत्तेपाठोपाठ पुणे महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने त्यांचे ‘अतिरिक्त’ न ऐकणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांमागे बदलीचा ससेमिरा लावला आहे. त्यामुळे अधिकारी वर्गात खळबळ माजली असली तरी भाजपची एकंदर कार्यपद्धती पाहून अधिकारी एक पाऊल मागे हटत असल्याने सव्वा वर्षांनंतरही पुण्यातील ‘विकास’ अजून रांगेनाही अशी उपरोधिक टीका सुरू सुरू झाली आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fa035f7e-8b36-11e8-94bd-1b1580f64926′]

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता येऊन सव्वा वर्षे झाली आहेत. तत्पूर्वी साडेतीन वर्षांपूर्वी पुण्यात एक खासदार आणि आठ आमदार निवडून आलेल्या भाजपने ‘ गल्ली ते दिल्ली ‘ असा प्रचार करून महापालिका निवडणुकीत भक्कम बहुमत मिळवले. परंतु आतापर्यंत निवडणुकीत आश्वासन दिल्या प्रमाणे अद्याप नागरी सुविधांच्या दृष्टीने फार काही करु शकले नसले तरी अधिकाऱ्यांच्या मागे हात धुवून लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यात सत्तेत आल्यानंतर रिलायन्स कंपनीला खोदाई आणि टॉवर उभारण्याची परवानगी देताना ‘ पारदर्शकता’ राखणारे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची पहिली उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागेवर आलेले अभिषेक कृष्णाही राजकीय निर्णयाचा बळी ठरले. तेही स्थिरावण्याच्या आत पुन्हा त्यांना नागपूर दाखविण्यात आले.

चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या एस्टीमेट मध्ये ऐनवेळी केबल डक्ट चे कोट्यवधींचे काम घुसडण्यास नकार देणाऱ्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार या देखील सत्ताधाऱ्यांच्या हिटलिस्टवर आल्या. परंतु देशभ्रतार यांच्या या निर्णयामुळे चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे रिईस्टीमेट आणि रिटेंडर झाले आणि पालिकेचे एक हजार कोटी वाचले. त्या ‘इंटरेस्ट’ चे विषय करत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनाही मुदतीपूर्वीच हलविण्यात आले. पीएमपीएमल च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर झटपट निर्णय घेऊन पीएमपी व्यवस्थापनात बदल घडवणाऱ्या तुकाराम मुंढे हे सत्ताधाऱ्यांना रुचतील हे शक्यच नव्हते. अवघ्या सहा महिन्यांच्या काळात सर्वांना ‘ कामाला’ लावणाऱ्या मुंढे यांनी सहा महिन्यात पीएमपीचा तोटा कमी करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करून सेवा सुधारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचीही बदली करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेतला.

[amazon_link asins=’B077PWK5BT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff605bf2-8b36-11e8-954e-af90fb6cbd93′]

आता आणखी एक अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली या भाजपच्या रडारवर आल्या आहेत. कर्मचाऱ्यांची बढती,बदलीची प्रकरणे असोत अथवा ठेकेदारांची रिंग तोडणाऱ्या उगले या भाजप नगरसेवक आणि नेत्यांच्या रडारवर आल्या आहेत. सर्वसाधारण सभेत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यामुळे त्या किती दिवस पालिकेत असतील ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याचा परिणाम आता अन्य अधिकाऱ्यांवर होत आहे. आपल्याला हवा तसा निर्णय करू द्यावा यासाठी बहुतांशी नगरसेवक, नगरसेविका आणि त्यांचे पतीराज अधिकाऱ्यांना दमदाटी करत आहेत. नुकतेच एका नेत्याच्या हट्टापायी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला मारहाण तर केलीच परंतु अतिक्रमण कारवाई मध्ये खंडणीचा गुन्हाही दाखल केला गेला. याचा धसका सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला असून याचा परिणाम विकास कामांवर झाला आहे. त्यामुळेच विरोधकही आता भाजपचा पुण्यातील ‘विकास’ अजून ‘रांगत’ही नाही अशी टीका होऊ लागली आहे.