‘मोदी’ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं देशावर आर्थिक ‘मंदी’चं सावट, ‘राष्ट्रवादी’कडून ‘ट्विट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झालं. राज्यात सरकार स्थापन करण्यास शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस जबाबदार असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत होती. त्यामुळे राज्यातील गुंतवणूकीवर परिणाम होत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून महाविकासआघाडीवर करण्यात आला. परंतू असे होत असताना देशाचा जीडीपी किती आहे याचे आकडे समोर आले आणि देशासमोरील आर्थिक आव्हान किती मोठे आहे हे समोर आले. देशाचा जीडीपी मागील 5 वर्षातील सर्वात निचांकी स्तरावर आला आणि 4.5 टक्क्यांवर येऊन थांबला. जो 2014 पूर्वी 8.5 टक्क्यांवर पोहचला होता.

यावर भाष्य करणारे ट्विट आज राष्ट्रवादीकडून करण्यात आले आणि भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. राष्ट्रवादीने आज आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्यंगचित्र टाकले आहे आणि देशातील आर्थिक मंदीला मोदी सरकार कसे जबाबदार आहे यावर भाष्य केले. यात पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या कोट्यावधीच्या खर्चावर टीका करण्यात आली. याचा परिणाम एअर इंडियावर कसा होत आहे हे देखील यात सांगितले.

राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले की मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक मंदीच्या सावटाखाली आहे. असे असताना परदेश दौऱ्यांवर मोदी सरकारने कोट्यवधींचा खर्च केलेला आहे, तसेच एअर इंडियाला खर्चाची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे खरंतर एअर इंडियाला बुडवण्यात केंद्र सरकारचादेखील सहभाग असल्याचे स्पष्ट होतंय.

राष्ट्रवादीने पंतप्रधान मोदी आणि एअर इंडियावर एक व्यंगचित्र देखील पोस्ट केले आहे. शिवाय सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर टीका देखील केली आहे. यात म्हटले आहे की कर्जाच्या बोझ्यामुळे डबघाईला आलेल्या एअर इंडिया कंपनीला विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एअर इंडियाचे सरकारनेच 797 कोटी 95 लाख रुपये थकवल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यातील 458 कोटी 95 लाख 90 हजार रुपये खर्च केवळ पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांवर करण्यात आलेला आहे.

देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आल्याची टीका अर्थतज्ज्ञांकडून होताना दिसत आहे. देशाला आर्थिक मंदी सतावताना दिसत आहे. देशाचा विकास दर ढासळला आहे. जवळपास टक्क्यांनी देशाचा आर्थिक दर कोसळला आहे. देशाचा आर्थिक विकास जितका मागासेल तितकीच बेरोजगारीचे संकट आधिक बळावेल. केंद्र सरकारकडून यावर उपाय योजना सुरु असल्याचे सांगितले जात आहे. परंतू अर्थव्यवस्थेला हातभार लागताना दिसत नाही. या कारणाने आता भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होत आहे.

Visit : policenama.com