‘या’ 4 कारणांमुळं देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही एक चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, तरीही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. असे असताना या रुग्णवाढीच्या कारणांचा अभ्यास तज्ज्ञांनी केला आहे. त्यानुसार तज्ज्ञांनी चार प्रमुख कारणे सांगितली आहेत.

नवा म्युटंट कारणीभूत

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे नवा म्युटंट आहे. देशात नव्या म्युटन्टचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रात हा म्युटंट आढळून आला आहे. याच कारणामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त असल्याचे दिसत आहे. याशिवाय एकूण रुग्णसंख्येपैकी 20 टक्के रुग्ण या नव्या म्युटंटने बाधित असल्याचे सांगितले जात आहे.

इम्युनिटी गमावल्याने रुग्णसंख्येत वाढ

तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हे समोर आले, की ज्यांना कोरोनाची बाधा झाली होती अशी देशातील 20 ते 30 टक्के लोकं त्यांनी सहा महिन्यांच्या काळात इम्युनिटी गमावली आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण होत आहे. तसेच एप्रिल महिना कोरोना संसर्गाचा पीक असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.

सर्वच व्यवहार सुरु केल्याचा परिणाम

जेव्हा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला त्यानंतर पुन्हा सर्वकाही सुरु करण्यात आले. त्यावेळी काहीही खबरदारी घेण्यात आली नाही. कारण सर्वांना वाटत होते आता कोरोना महामारी गेली, ती परत येणार नाही अशीच मानसिकता तयार झाली होती. शिवाय दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग दुप्पट आहे.

लसीकरण वाढवण्याची गरज

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. मात्र, या लसीबाबत अनेकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे अनेकांनी ही लस घेण्यास तयारी दर्शवली नाही. सध्या देशातील 0.7 टक्के लोकांनी कोरोनावरील दोन्ही डोस घेतले आहेत, तर 5 टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवण्याची गरज आहे.