शिवशाहीचा प्रवास ठरतोय धोकादायक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

पुणे सोलापूर महामार्गावर तुळजापूरहुन पुण्याला चाललेल्या शिवशाही बसचा (MH 09 EM 1270) यवत येथे अचानक टायर फुटला. बस चालकाच्या प्रसंगावधनाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालकाचे प्रवाशांनी आभार मानले. मात्र यावेळी बसमधील प्रवाशांना दुसऱ्या शिवशाही बसने पुण्याला पाठवण्यात आले. ही घटना शनिवारी (दि.१२) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली

गाडीत एकूण 45 प्रवासी होते यावेळी प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागला. निम्म्याहून प्रवाशांना उन्हाळ्यामध्ये एसी कोचची सोय असणारी शिवशाही मात्र बाहेरून दिसती तशी नाही. शिवशाहीचे टायर अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत यावरून सिद्ध झाले आहे.

असाच प्रकार काही दिसवांपूर्वी बार्शीजवळ घडला होता. आंबेजोगाई डेपोची शिवशाही बस बार्शीजवळ आल्यानंतर तीचा टायर फुटला होता. मात्र यावेळीही चालकाने प्रसंगावधान ओळखून गाडीवर नियंत्रण मिळवले होते. त्यावेळी बसमधील सर्व प्रवाशांना रात्र रस्त्यावर काढावी लागली होती. चालकाने बर्शी बसस्थानकाकडे मदत मागितली होती. परंतू वेळेवर मदत मिळाली नाही. त्यामुळे शिवशाहीचा प्रवास खरोखरीच सुखकर आणि सुरक्षित आहे का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.