अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक  : पोलीसनामा ऑनलाइन – आधीच्या अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ बसली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती झाली. पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी त्यांना पुन्हा निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आले आहेत त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात स्पष्ट बहुमत नसताना देखील स्थिर सरकार दिले. मागील पाच वर्षात महाराष्ट्रात गुंतवणुकीचं चांगलं वातावरण मिळालं, शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या. शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु केली. त्याचप्रमाणे छोट्या व्यापाऱ्यांना देखील पेन्शन योजना सुरु केली आहे. देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा स्थिर राजकारणाची संधी आहे त्यामुळे आगमी विधानसभा निवडणुकीत पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदतीने सरकार स्थापन केले. त्यावेळी आपल्या जवानांनी बुलेट फ्रुफ जॅकेटची मागणी केली. मात्र, त्या सरकारने त्यांची ही मागणी पूर्ण केली नाही. भाजपचे सरकार येताच जवानांची ही मागणी पूर्ण केली. आणि विशेष म्हणजे हे जॅकेट भारतात बनवण्यात आली. आणि आनंदाची बाब म्हणजे आज हेच जॅकेट बाहेरील देशात निर्यात केले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवलं आहे. हा माझा सन्मान आहे.

मी देवेंद्र फडणवीस यांना नमन करण्यासाठी आलो आहे. चार हजार किमीच्या यात्रेत कोट्यवधी लोकांनी आशीर्वाद दिला आहे.

देवेंद्र फडणीस यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली आहे. आता महाराष्ट्राला पुन्हा स्थिर राजकारणाची संधी आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात कधी काळी एकाच ताटात जेवायचे. गुजरातमध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मला दिली. जो फायदा देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे तो कधीकाळी मला मिळाला होता.

देशाच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्द आहे. आधीच्या सरकारची मात्र काय भूमिका होती हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. २००९ रोजी आपल्या लष्कराने १ लाक ८६ हजार बुलेटप्रूफ जॅकेटची मागणी केली होती. पुढील पाच वर्षात काँग्रेस सरकारने लष्कराच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्यासाठी जॅकेट खरेदी केलं नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही खरेदी प्रक्रिया सुरु केली. भाजपा सरकारचा अर्थच आहे की देशाच्या सुरक्षेसाठी प्राथमिकता असून आमच्यासाठी देशापेक्षा मोठं काही नाही असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

काश्मीरला स्वर्ग करण्याचा १३० कोटी जनतेचा संकल्प आहे. ज्या धर्तीवर रक्त सांडण्यात आलं त्या काश्मीरला स्वर्ग करण्याचा १३० कोटी जनतेचा संकल्प आहे.

visit : Policenama.com