‘दगडूशेठ’ ला १२६ किलोच्या माव्याच्या मोदकाचा महानैवेद्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात गणपतीला १२६ किलोच्या माव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखविण्यात आला. बार्शीचे किराणा व्यापारी कचरुलाल देबडवार यांनी हा मोदक बाप्पाला अर्पण केला असून काका हलवाईचे युवराज गाडवे आणि महेंद्र गाडवे  यांनी कारागिरांच्या सहाय्याने अवघ्या ४ तासात हा मोदक साकारला आहे.

यंदाचा देखावा असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात १२६ किलो मोदक पाहण्यासोबतच त्याचे फोटो घेण्याकरीता भाविकांनी गर्दी केली. गाडवे यांच्यासह काका हलवाईमधील ६ ते ८ कामगारांनी हा मोदक तयार केला आहे. अत्यंत आकर्षक कलाकुसर व सजावट या मोदकावर करण्यात आली आहे.

युवराज गाडवे म्हणाले, माव्याच्या मोदकावर काजू, बेदाणे, बदाम, केशर यांसह विविध प्रकारचा सुकामेवा लावण्यात आला आहे. याशिवाय वरच्या बाजूला चांदी व सोन्याचे वर्क लावण्यात आले आहे. मागील वर्षी देखील ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ किलोचा मोदक साकारण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळनंतर काका हलवाई मध्ये हा ठेवलेला हा मोदक पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळांना २ ढोल पथकांनाच परवानगी 

[amazon_link asins=’B0797TFXZ2,B0763PDJ7W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’016d5ce0-b80d-11e8-ba0e-0df22ba41257′]