Duleep Trophy | 20 वर्षीय यशस्वीने दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेत द्विशतक झळकावत अजित वाडेकर यांचा 60 वर्षांपूर्वीचा मोडला ‘तो’ विक्रम

पोलीसनामा ऑनलाईन टीम – 20 वर्षीय यशस्वी जैस्वालने (Yashswi Jailwal) दुलीप चषक (Duleep Trophy) क्रिकेट (Cricket) स्पर्धेत आज ऐतिहासिक खेळी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वेस्ट झोन (West Zone) विरुद्ध साऊथ झोन (South Zone) यांच्यात आज दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत सुरू आहे. या स्पर्धेत साऊथ झोनने पहिल्या डावात 57 धावांची आघाडी घेत वेस्ट झोनला बॅकफूटवर फेकले. यानंतर वेस्ट झोनने दुसऱ्या डावात शानदार खेळ करत 315 धावांची भक्कम आघाडी घेतली. यामध्ये यशस्वीच्या द्विशतकाचा समावेश आहे. यशस्वीने शुक्रवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी द्विशतक झळकावताना 1962 सालचा अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांचा विक्रम मोडला आहे. (Duleep Trophy)

 

 

 

हेत पटेल (98) व जयदेव उनाडकत (47) यांनी पहिल्या डावात वेस्ट झोनला सावरले आणि संघाला 270 धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यात  साऊथ झोनच्या आर साई किशोरने 86 धावांत 5 विकेट्स घेतल्या. बसिल थम्पी व सी स्टीफन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. यानंतर प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या साऊथ झोनच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. बाबा अपराजितने 125 चेंडूंत 14 चौकारांसह 118 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मनिष पांडे (48), कृष्णप्पा गौथम (43) व रवी तेजा (34) यांनी साऊथ झोनच्या धावसंख्येत हातभार लावला. साऊथ झोनला पहिल्या डावात 327 धावा करता आल्या. या सामन्यात जयदेवने ४, अतित शेठने ३ व चिंतन गजाने २ विकेट्स घेतल्या. (Duleep Trophy)

 

 

यानंतर वेस्ट झोनने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत या सामन्यात पुनरागमन केले. यावेळी संघाचा कर्णधार अजिंक्य राहणे 15 धावा करून झटपट आउट झाला. यानंतर यशस्वी व प्रियांक पांचाळ यांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी करून वेस्ट झोनला चांगली सुरुवात करून दिली. प्रियांक 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी व श्रेयस अय्यरची जोडी जमली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी करताना संघाला तीनशेपार नेले.

 

श्रेयस 113 धावांत 4 चौकार व 2 षटकारांसह 71 धावांवर बाद झाला,
मात्र यशस्वीअजूनही  एका बाजूने खिंड लढवत आहे.
त्याने 244 चेंडूंत 23 चौकार व 3 षटकारांसह 209 धावा करताना संघाला 3 बाद 376 धावांपर्यंत पोहोचवले आहे.
या सामन्यात वेस्ट झोनने 319 धावांची आघाडी घेतली आहे.
यशस्वी जैस्वाल प्रथम श्रेणी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा भारताचा युवा फलंदाज ठरला आहे.
या अगोदर हा विक्रम अजित वाडेकर यांच्या नावावर होता. त्यांनी 1962 मध्ये राजस्थान विरुद्ध हा विक्रम केला होता.
त्यावेळी अजित वाडेकर यांचे वय 20 वर्ष व 354 दिवस होते तर
यशस्वी जयस्वालचे वय 20 वर्ष व 269 दिवस आहे.

 

Web Title :- Duleep Trophy | 20 year old yashasvi jaiswal smashed double hundred
from just 235 balls in the duleep trophy final become youngest indian to
score a double century in a first class final

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा