डंपर, क्रुझरच्या भीषण अपघातात ४ तरुण ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे डंपर आणि क्रुझर या दोन गाड्यांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात क्रुझरमधील ४ तरुणांचा जागीच मृत्यु झाला. गाडीत असलेल्या इतर जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही धडक इतकी भीषण होता की भरधाव क्रुझरने डंपरला धडक दिल्यानंतर चालकासह पुढे बसलेले प्रवासी काच फुटून पुढे फेकले गेले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात कोल्हापूर -राधानगरी या मार्गावरील घोटवडे येथे सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला.

कोल्हापूरला कामाला जाणाऱ्यांना घेऊन जाणारी प्रवासी वाहतूक करणारी क्रुझर ही वेगाने कोल्हापूरच्या दिशेने येत होती. क्रुझरमधील सर्व जण कोल्हापूर एमआयडीसीला कामाला जात होते. त्यावेळी पाऊसही पडत होता. तरीही त्याचा वेग जास्त होता. हा रस्ता लहान असल्याने समोरुन आलेल्या वाहनाला जागा देण्यासाठी एकाला रस्त्याच्या कडेला व्हावे लागते. वेगाने जात असताना क्रुझरचालकाला वळणावर समोरुन आलेला डंपर दिसला नाही. धडक वाचविण्याचा त्याने प्रयत्नही केला. परंतु, क्रझरचा वेगच इतका होता की तो डंपरला जाऊन जोरात धडकला.

अपघातातील सर्व तरुण राधानगरी तालुक्यातील आहेत. या अपघातामुळे कोल्हापूर – राधानगरी आणि तेथून पुढे कोकणात जाणारी वाहतूक सुमारे ३ तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

You might also like