मद्यपी चालकांकडून सहायक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरताना अडविल्याचा राग आल्याने मद्यपी वाहनचालकाने सहायक पोलीस निरीक्षकाला अपशब्द वापरून धक्काबुक्की केली. पाषाणमधील लमाणतांडा परिसरात गुरूवारी (दि. 18) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दुचाकीवरील 5 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पवार आणि अंमलदार साळवी गुरुवारी पहाटे लमाणतांडा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना परिसरात एक मोटार संशयास्पद फिरताना दिसली. त्यामुळे त्यांनी मोटार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मद्यपान करून वाहन चालवित असलेल्या चालकाने सहायक पोलीस निरीक्षक पवार यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एल. एस. उर्किडे तपास करीत आहेत.