शिवसेना उपविभागप्रमुखावर हल्ला करण्यासाठी परदेशातून मिळाली होती ‘सुपारी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या गुरुवारी विक्रोळी येथील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार झाली या हल्यात त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला दुखापत झाली होती. जाधव हे नियमितपणे देवदर्शनासाठी साईबाबा मंदिर, टागोरनगर, विक्रोळी येथून देवदर्शन आटोपून मंदीरातील कार्यालयात बसले असताना अचानकपणे एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. ज्यात त्याच्या हल्यात दुखापत झाली.

हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून जात असताना जखमी जाधव व मंदिरातील इतर लोकांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने आणखी गोळीबार केला. मात्र, हल्लेखोरांना पकडण्यात नागरिकांना यश आले. सागर मिश्रा असे या हल्लेखोरांचे नाव आहे. दरम्यान, सागर याच्या अधिक चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गोळीबार करणाऱ्या सागर मिश्राला पकडताना झालेल्या मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर जखमी जाधव व गोळीबार करणाऱ्या इसमास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सागर मिश्राच्या अधिक चौकशीनंतर मध्यप्रदेश येथे गेलेल्या पथकाने कृष्णधर सिंग याला ताब्यात घेतले आहे. ठाणे येथे गेलेल्या पथकाने आनंद फडतरेला ताब्यात घेतले. या दोघांना कोर्टात हजर केले असता १ जानेवारी २०२० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, सागर याला गोळीबार करण्याचे कारण विचारले असता, ‘प्रसाद पुजारी ने मारने के लिए भेजा है।’ असे त्याने सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेकडे हे प्रकरण चौकशीसाठी देण्यात आलं आहे. गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाने सुरु केला. तसेच, आरोपीने ज्या रिव्हॉल्वरमधून जाधव यांच्यावर गोळीबार केला होता. ते रिव्हॉल्वर हे कानपुर आईनन्स फॅक्टरी येथील बनावटीचे असल्याने त्यांचेकडून लायसन्स धारकाची माहिती प्राप्त करण्यात आली.

पुढील तपासकामासाठी खंडणीविरोधी पथकाची आणखी तीन पथके ठाणे, मध्यप्रदेश आणि कर्नाटक येथे रवाना झाली. तसेच ताब्यात घेतलेल्या कृष्णधर सिंग आणि फडतरे त्यांचेकडे केलेल्या चौकशीत निदर्शनास आले की, परदेशातील गँगस्टर प्रसाद पुजारी याने सुरूवातीस मध्यप्रदेश येथील त्याचे साथीदार कृष्णधर सिंग व सागर मिश्रा याला जाधव यांच्यावर हल्ला करण्याच्या हेतूने मुंबईत पाठविले.

त्यानंतर प्रसाद पुजारी याच्या सांगण्यावरून मुंबईतील एका साथीदारांनी त्यांची राहण्याची सोय केली. त्यानंतर त्या साथीदाराला आरोपी आनंद फडतरे, राहणार – ठाणे याने विनानंबर प्लेटची मोटरसायकल पुरविली. त्यानंतर सिंग हा साथीदार गोळीबार करण्यासाठी सागर मिश्रा याच्यासह टागोरनगर येथे आला. चंद्रशेखर जाधव हे सदर ठिकाणी आल्याची खात्री करून सागर मिश्रा याने त्यांच्यावर गोळीबार केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/