५ रूपयाच्या अर्जासाठी ५० हजाराचा बसला ‘फटका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या घटनांत मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. जगातील कोणत्याही कोपऱ्यात बसून हे ठग लोकांना फसवत असतात. सामान्य नागरिकांबरोबरच हे ठग मोठ्या कंपन्या आणि बँकांनाही आपले शिकार बनवत असतात. अशाच प्रकारची एक घटना मुंबईतील अंधेरीत समोर आली आहे. एका महिलेला या ठगांनी मोठा गंडा घातला आहे. पाच रुपयांच्या एका पेमेंटसाठी या महिलेला ५० हजार रुपयांचा भुर्दंड पडला.

बस ट्रॅव्हल्सच्या पाच रुपयांच्या नोंदणी अर्जासाठी शुल्क भरताना या महिलेला हा मोठा फटका बसला.
एका वेबसाइटवरून तिने पैसे भरण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला हा फटका बसला. गुगलवरून मिळालेल्या एका क्रमांकावरून या महिलेले पैसे भरण्याचा प्रयत्न केला. ते पेमेंट पूर्ण झाले मात्र यानंतर या ठगांनी तिच्या खात्यावरून ५० हजार रुपये काढून तिला गंडा घातला.

डेजी नाडर असे या २७ वर्षीय तरुणीचे नाव आहे. त्यानंतर या प्रकरणाची अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या काकांना मदुराई येथे जाण्यासाठी तिकीट बुक करायचे होते. यासाठी या महिलेने ऑनलाईन वेबसाइटवरून पिंटा ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्स कंपनीचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्या क्रमांकावर झालेल्या संभाषणानुसार तिला पाच रुपये शुल्क भरण्यास सांगण्यात आले, मात्र त्यानंतर तिच्या खात्यातून अचानक ४०,३५४ रुपये कट झाल्याचा संदेश आल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.

दरम्यान, या प्रकरणी फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय