सावधान ! बाजारात विकलं जातोय झाडूनं तयार झालेला ‘जीरा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भेसळयुक्त पदार्थांचा बाजारात भडीमार झाला आहे. मिठाईपासून मसाल्यापर्यंत सर्वच पदार्थात भेसळ करण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता या लिस्टमध्ये आणखी एक पदार्थांची भर पडली आहे. तुम्ही देखील जिरे खरेदी करताना सावध व्हा. कारण बाजारात खोटे जिरे आले आहेत. जिरे अन्नपदार्थात स्वाद वाढवण्यासाठी वापरेल जातात. आरोग्यासाठी देखील जिरे फायदेशीर आहेत. भाज्यापासून अनेक आयुर्वेदिक औषधात जिऱ्यांचा वापर करण्यात येतो परंतू आता या गुणकारी जिऱ्यात देखील भेसळ पाहायला मिळत आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की खोटे जिरे बनवणाऱ्या व्यवसायांचा उद्योग उघड झाला आहे. येथे एक विशेष प्रकारची गवत, दगडाचे दाने आणि गुळाच्या सिरपने तयार करण्यात येणारे जिरे बनवण्यात येत होते. पोलिसांनी या उद्योग करणाऱ्यांकडून 20 हजार किलो तयार खोटे जीरे आणि 8 हजार किलो कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी सांगितले की खोटे जिरो बनवण्यासाठी त्यांनी कोणतीही मेहनत घ्यावी लागत नाही. आणि त्यांना त्यासाठी फक्त 3 पदार्थ लागतात. जंगली गवत, दगडाचे दाने आणि गुळाचे सिर याचा वापर करुन खोटे जिरे तयार करण्यात येतात. ज्याला बाजारात स्वस्तात विकले जाते. त्यासाठी लागणारे गवत नदीच्या किनारी मिळते. याला जिऱ्यासारखीच काही छोटी पाने असतात त्यामुळे हे ओळखणे अवघड होते.

गवताच्या या छोट्या पानांना गुळाच्या पाण्यात टाकून नंतर सुकवले जाते, ज्यामुळे त्यांना जिऱ्याचा रंग येतो. यानंतर याला दगडापासून बनवलेल्या पावडरमध्ये मिसळले जातात. त्यानंतर ते खऱ्या जिऱ्याप्रमाणे दिसतात. बाजारात खऱ्या जिऱ्यांचा भाव जवळपास 300 रुपये किलो आहे तर खोटे जिरे बाजारात 20 रुपये किलोने दुकानदारांना विकले जातात. हे खोटे जिरे आरोग्यासाठी खूपच घातक आहेत. याच्या सततच्या सेवनाने आपल्या इम्युनिटीवर त्याचा परिणाम होतो. याशिवाय हे खाल्याने स्टोन आणि त्वचेचे आजार होऊ शकतात.

कसे ओळखावे खोटे जिरे –
खोटे आणि खरे जिरे ओळखन खूपच सोपे आहे. एका वाटीत पाणी घ्या आणि त्यात जिरे टाका. जर या जिऱ्यांचा रंग जातो किंवा ते तुटायला लागतात तेव्हा ते खोटे आहे असे ओळखावे. खरे जिरे मजबूत आणि रंग न जाणारे असतात. पाण्यात टाकल्यावर त्याचा रंग जात नाही. ते तसेच्या तसेच राहतात.

Visit :  Policenama.com