Sangli News : सांगलीत बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद ; LCB ची कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –   सांगली(Sangali) येथे दोन हजार आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा (Sangli Fake Currency) तयार करून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या विभागाने जेरबंद केली. त्यांच्याकडून लाखांचा बनावट नोटांसह कलर प्रिंटर, एलसीडी स्क्रीन स्कॅनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोरोची येथे नोटा बनवणाऱ्या संशियितासही अटक करण्यात आले. विजय बाळासो कोळी (वय ३३ रा. दत्तनगर कुपवाड ), शरद बापू हेगडे (वय ३४. रा. राम-रहीम कॉलनी संजयनगर ) आणि तेजस उर्फ भावड्या सूर्यकांत गोरे (वय २३, रा. गावठाण मोरोची, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्वरित त्या संशयितांचा शोध घेऊन कारवाईचे आदेश एलसीबीला दिले. त्यानुसार पथक तयार केले. त्या पथकाने तेथील कुपवाड परिसरात ते संशियित आरोपी याना पकडले. त्यावेळी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून विजय कोळी यांच्याकडे दोन हजारांच्या दहा नोटा आणि हेगडे यांच्याकडे २९ नोटा मिळाल्या. हेगडे याची चौकशी केली असता हेगडे यांनी त्याचा नातेवाईक भावड्या गोरे याने नोटा बनविल्याचे कबुली दिली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तातडीने सोलापूर जिल्ह्यात छापा मारला असता गोरे यांच्या घरात बनावट नोटा मिळाल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक गेडाम यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी केली.